प्रश्न तुमचे, आवाज 'लोकमत मुंबई'चा; WhatsApp नंबर तुमच्या हक्काचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:45 PM2023-06-26T16:45:56+5:302023-06-26T16:49:20+5:30

तुमचे हे प्रश्न, समस्या आपण मिळून प्रशासनापर्यंत नेऊया. त्यासाठी आम्ही 91677 48009 हा 'लोकमत मुंबई'चा  WhatsApp नंबर तुम्हाला देत आहोत.

lokmat mumbai whatsapp number for citizens | प्रश्न तुमचे, आवाज 'लोकमत मुंबई'चा; WhatsApp नंबर तुमच्या हक्काचा!

प्रश्न तुमचे, आवाज 'लोकमत मुंबई'चा; WhatsApp नंबर तुमच्या हक्काचा!

googlenewsNext

मुंबई शहराची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. गजबजाट, गर्दी, सतत धावणारं आणि कधीही न झोपणारं हे शहर सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. देशाची आर्थिक राजधानी आणि ग्लोबल शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत नागरिकांच्या समस्याही दिवसागणिक बदलत असतात. यात मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पण, कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या शहरात अनेक समस्या दुर्लक्षित राहतात, कितीतरी प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यांची दखलच घेतली जात नाही.

या प्रश्न, समस्यांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचा आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक पाऊल उचललं आहे. 'लोकमत मुंबई' हे मुंबईकरांच्या हक्काचं व्यासपीठ आहे. गेल्या महिन्याभरात आम्ही व्हिडीओ आणि बातम्यांमधून काही समस्या मांडून प्रशासनाला त्याची दखल घ्यायलाही भाग पाडलं आहे. 

'लोकमत मुंबई'च्या 'बागेची बातमी' या सीरिजमध्ये मुंबई मनपा हद्दीतील बागांच्या दुरवस्थेचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून घेतला जात आहे. या व्हिडीओंची दखल घेऊन काही प्रभागांमध्ये बागांची डागडुजी, सुशोभीकरण करण्यात आलं. हा इम्पॅक्ट नक्कीच आश्वासक आणि आशादायी आहे.     

कोणत्याही शहराची प्रगती प्रशासनासोबतच तेथील नागरिक किती जबाबदारीनं वागतात यावर ठरते. सुजाण नागरिकांच्या सहकार्यानंच शहर पुढे जातं. या बदलत्या शहराच्या बदलत्या गरजा लक्षात घेता असंख्य प्रश्न, अडचणी दिवसागणिक निर्माण होतात. 

तुमचे हे प्रश्न, समस्या आपण मिळून प्रशासनापर्यंत नेऊया. त्यासाठी आम्ही 91677 48009 हा 'लोकमत मुंबई'चा  WhatsApp नंबर तुम्हाला देत आहोत. त्यावर, तुमच्या परिसरातील समस्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवा. आम्ही हे विषय बातम्या आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत घेऊन जाऊ. प्रसंगी त्यांना जाब विचारू, जागं करू. आपलं शहर - आपली मुंबई आणखी स्वच्छ-सुंदर-विकसित करण्याचं हे मिशन आहे. त्यात तुमची साथ लागेलच!

'लोकमत मुंबई'चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी येथे क्लिक करा. तसंच लोकमत मुंबईचं ट्विटर हँडल फॉलो करा

Web Title: lokmat mumbai whatsapp number for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई