‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:35 AM2019-02-05T01:35:28+5:302019-02-05T01:35:46+5:30

‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल.

'Lokmat Mahamarethan': Register at mahamarathon.com/pune/ | ‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर

‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर

googlenewsNext

पुणे  - ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल.

व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत आहे.
‘लोकमत महामॅरेथॉन’ या ‘सर्किट रन’मध्ये राज्यातील ५ शहरांचा समावेश आहे. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम राबविणारे ‘लोकमत’हे एकमेव वृत्तपत्र आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर शहरांत झालेल्या या शर्यतीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला आहे. पुण्यात या ‘सर्किट रन’चा समारोप होत आहे.

‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे ब्रीदवाक्य असलेली सर्किट रनच्या समारोपाची ही महामॅरेथॉन अनेक बाबींमध्ये आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. यात विजेत्यांना सहा लाख रुपयांची बक्षिसे तर मिळणार आहेतच; पण त्याहीपेक्षा वेगळे आहे ते १०, तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मिळणारे पदक. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांची भल्या पहाटेपासून धावपळ सुरू होते. वृत्तपत्रविके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या ‘लिमिटेड एडिशन’ पदकामुळे १० व २१ किमीची शर्यत धावपटूंचे लक्ष वेधून घेत आहे.
या खास पदकाचे अनावरण पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते सोमवारी ‘लोकमत’च्या कार्यालयात झाले. ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आणि उपमहाव्यवस्थापक योगेंद्र मिश्रा यांनी स्वागत केले.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय
पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, गणेश चव्हाण, अमित जाधव, अनंता केंडे, यतीन चौधरी, केदार मारणे, यशवंत वादवणे, सोमनाथ कोकणे, सलीम सय्यद, ‘कॉलेज डायरी’ चित्रपटातील अभिनेते अविनाश खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

3 कि.मी. (फॅमिली रन)

३ कि. मी.च्या श्रेणीत सहकुटुंंब धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
कुटुंबातील सदस्याला प्रत्येकी ४०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
या अंतर्गत एक कुटुंबाला गुडी बॅग,
टी-शर्ट, पदक आणि अल्पोपाहार देण्यात येईल.

5 कि.मी. (फन रन)
५ कि.मी.च्या श्रेणीत १२ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
यासाठी धावपटूला ४९० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग,
टी-शर्ट, पदक आणि अल्पोपाहार देण्यात येईल.

10 कि.मी. (पॉवर रन)

10 कि. मी.च्या श्रेणीत १६ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
यासाठी धावपटूला ११०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.

21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन)

सर्वसामान्य नागरिक
२१ कि. मी.च्या श्रेणीत १८ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
यासाठी धावपटूला ११०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.

सैैन्यदल
२१ कि. मी.च्या श्रेणीत सेनादलातील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
यासाठी धावपटूला १००० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.

यांच्या सहयोगाने रंगणार स्पर्धा

अ‍ॅकॅडमिक पार्टनर- सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स
फाउंडेशन पार्टनर- फिनोलेक्स पाइप्स, मुकुल माधव फाउंडेशन
स्पाईसेस पार्टनर- सुहाना
फर्टिलिटी हेल्थ पार्टनर-झेनिथ अ‍ॅडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटर
क्लासेस पार्टनर- चाटे (द सिम्बॉल आॅफ मेरिट)
ट्रॅव्हल पार्टनर- एसटीए हॉलिडेज
वेलनेस पार्टनर- मल्टिफीट
मेडिकल पार्टनर- संचेती
अ‍ॅग्रो पार्टनर - आदिनाथ अ‍ॅग्रो, सुरभी
आउटडोर पार्टनर- धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.
फिटनेस पार्टनर- बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन
रेडिओ पार्टनर- ९३.५ रेड एफएम, बजाते रहो
हॉस्पिटॅलिटी पार्टनर - द आॅर्किड
टी-शर्ट पार्टनर- संदीप युनिव्हर्सिटी
फूड अँड बेव्हरेज पार्टनर- फ्रूट एक्स
रेस मॅनेजमेंट पार्टनर- रिलॅक्स झील
पेन रीलिफ पार्टनर- विंटोजिनो
डीजिटल पार्टनर- एलिफंट अँड अ‍ॅन्टस्
डीजिटल पार्टनर- पुणे इट आऊटस्
हेल्थ फूड पार्टनर- नेचर्स लाइफस्टाइल कॅफे
एनजीओ पार्टनर- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१
बुकिंग पार्टनर- टाऊनस्क्रिप्ट

विशेष सहकार्य
पुणे महानगरपालिका पुणे मेट्रो
पुणे पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट
कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीसाठी ७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० दरम्यान 020-66848586
या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: 'Lokmat Mahamarethan': Register at mahamarathon.com/pune/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.