मराठी वर्तमानपत्रांमध्ये ‘लोकमत’च ‘इंडियाज मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँड’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:49 AM2018-12-29T06:49:41+5:302018-12-29T06:50:30+5:30

देशातील सर्वांत आकर्षक ब्रँडचे सर्वेक्षण करून टीआरए रिसर्चने सर्वोत्कृष्ट एक हजार ब्रँडचा समावेश असलेल्या ‘इंडियाज मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँड्स रिपोर्ट २०१८’ची घोषणा नुकतीच केली.

Lokmat in 'India's Most Attractive Brand' | मराठी वर्तमानपत्रांमध्ये ‘लोकमत’च ‘इंडियाज मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँड’

मराठी वर्तमानपत्रांमध्ये ‘लोकमत’च ‘इंडियाज मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँड’

googlenewsNext

मुंबई : देशातील सर्वांत आकर्षक ब्रँडचे सर्वेक्षण करून टीआरए रिसर्चने सर्वोत्कृष्ट एक हजार ब्रँडचा समावेश असलेल्या ‘इंडियाज मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँड्स रिपोर्ट २०१८’ची घोषणा नुकतीच केली. या अहवालात मराठी वर्तमानपत्र विभागात ‘लोकमत’ने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. अहवालात ४९ भारतीय कंपन्यांसह देशातील १८ अमेरिकन, ६ दक्षिण कोरियन, ६ जपानी व २ चिनी ब्रँडच्या कंपन्यांनी आघाडीच्या १०० मोस्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह ब्रँडमध्ये स्थान मिळवले.
गतवर्षी एक हजार ब्रँडमध्ये ८७८व्या क्रमांकावर असलेल्या ‘लोकमत’ने यंदा ६०५व्या क्रमांकावर झेप घेतली. २०१७ला ‘लोकमत’ व्यतिरिक्त कुठल्याही मराठी वृत्तपत्रास या यादीत स्थान मिळविता आले नव्हते. यंदा ‘लोकमत’ने गरुडझेप घेत हिंदीसह इंग्रजी भाषेतील काही वर्तमानपत्रांनाही मागे टाकले. माध्यम-प्रिंट विभागात ‘लोकमत’ने सातवा क्रमांक पटकावला. महत्त्वाचे म्हणजे तमिळ वृत्त वाहिन्या, क्रीडा, संगीत वाहिन्या, तेलगू, कन्नड वृत्त वाहिन्या, मराठी वृत्त वाहिन्या यांहून ‘लोकमत’ अधिक आकर्षक ब्रँड ठरला आहे.
यासंदर्भात टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले की, यंदा अहवालाचे पाचवे वर्ष आहे. संशोधनामध्ये जेव्हा ब्रँड अधिक गुण मिळवतात, तेव्हा त्यांनी ग्राहकांच्या अंतर्मनामध्ये ठसा उमटवलेला असतो. अशा ब्रँडचा ग्राहकांवर प्रचंड प्रभाव असतो. आकर्षकतेच्या ३६ प्रोप्रायटरी निकषांच्या आधारे केलेल्या प्राथमिक संशोधनातून हा अहवाल साकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Lokmat in 'India's Most Attractive Brand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत