मुंबई - तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल थांबल्या ट्रेन थांबल्या आहेत. रेल्वे रुळाचा स्लीपर खराब झाल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गाची रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे प्राथमिक वृत्त आले होतं. रबाले ते ऐरोली दरम्यानचा प्रकार हा प्रकार घडल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर परिणाम झाला आहे.  यामुळे कार्यालयातून घर गाठण्याच्या वेळेत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


दरम्यान, सकाळी चुनाभट्टी ते कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.