LMOTY 2023: व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट! दिग्गज उद्योजक कुमार बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:29 PM2023-04-26T18:29:09+5:302023-04-26T18:30:08+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

LMOTY 2023 Visionary Industrialists Veteran entrepreneur Kumar Birla was awarded Lokmat Maharashtrian of the Year | LMOTY 2023: व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट! दिग्गज उद्योजक कुमार बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी 

LMOTY 2023: व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट! दिग्गज उद्योजक कुमार बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी 

googlenewsNext

राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. यंदा म्हणजेच २०२३ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट या विशेष पुरस्काराचे मानकरी दिग्गज उद्योजक आणि आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला ठरले आहेत. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. 

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील दिग्गज व्यवसायिकांपैकी एक आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे ते अध्यक्ष आहेत. १९९५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी बिर्ला समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वयाच्या केवळ २८ व्या वर्षी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. त्यांनी आपलं व्यवसाय कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या समूहाचा विस्तार केला. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. बिर्ला समूहाचा विस्तार ४० देशांमध्ये आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी भारताबाहेरील ३० पेक्षा अधिक कंपन्यांचं अधिग्रहण केलं आणि आदित्य बिर्ला समूहाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. आतापर्यंत त्यांच्या कार्याचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय.

Read in English

Web Title: LMOTY 2023 Visionary Industrialists Veteran entrepreneur Kumar Birla was awarded Lokmat Maharashtrian of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.