मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी रिपाइं आघाडीचे मनोज जरांगे यांना  पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 07:30 PM2024-03-06T19:30:51+5:302024-03-06T19:30:56+5:30

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी मिळवल्या त्यांचे दाखले देण्यात आले.

Letter to Manoj Jarange of Ripa Aghadi to withdraw the Maratha movement |  मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी रिपाइं आघाडीचे मनोज जरांगे यांना  पत्र 

 मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी रिपाइं आघाडीचे मनोज जरांगे यांना  पत्र 

श्रीकांत जाधव 
मुंबई: दहावीच्या परीक्षा आणि लग्नसराई असल्यामुळे जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनास स्थगिती द्यावी, अशी मागणी रिपाइं आठवले गटाच्या मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरगे यांनी जरांगे पाटील यांना एका पत्राद्वारे केली आहे. जरांगे यांना पत्र मिळाले असून त्यांनी अद्यपा उत्तर दिले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )  मराठा आघाडी व मराठा प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी मिळवल्या त्यांचे दाखले देण्यात आले. त्याबद्दल मुख्यमंत्री त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन निर्माण झालेल्या घटनेबद्दल चौकशी समिती मागे घ्यावी, मराठा आंदोलन दरम्यान जे गुन्हे दाखल झाले ते तात्काळ मागे घ्यावे, ड. गुणरत्न सदावर्दे यांनी दाखल केल्याबद्दल विरोधात सरकारने भूमिका मांडवी अशा मागण्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी केल्या आहेत.

Web Title: Letter to Manoj Jarange of Ripa Aghadi to withdraw the Maratha movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.