महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:53 AM2019-07-02T02:53:48+5:302019-07-02T02:53:57+5:30

वाहन चालवण्याचा परवाना काढण्यापूर्वी वाहनधारकाला संगणकीय चाचणीद्वारे शिकाऊ लायसन्स घेणे आवश्यक आहे.

 Learning license in college; Transport Minister's information | महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्र्यांची माहिती

महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्र्यांची माहिती

Next

मुंबई : शिकाऊ लायसन्स मिळवताना वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच लर्निंग लायसन्स देण्याचा निण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
परिवहन विभागाच्या धोरणानुसार मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर व चंद्रपूर येथील १३१७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देण्यात आले असून सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील महाविद्यालयामध्ये ही योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केले.
रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यापूर्वी वाहनधारकाला संगणकीय चाचणीद्वारे ार्निंग लायसन्स घेणे आवश्यक आहे. पण ते काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिवहन कार्यालयात येऊन संगणकीय चाचणीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्यामुळे महाविद्यालयातच त देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयात लर्निंग लायसन्स देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिल्याचे रावते म्हणाले.

Web Title:  Learning license in college; Transport Minister's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.