केईएम, सायन, जे.जे., कामा रुग्णालयांची सुरक्षा व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:26 AM2018-11-23T03:26:37+5:302018-11-23T03:26:54+5:30

राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांची कुमक पालिका रुग्णालयात नियुक्त केली. येथे राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत.

 KEM, Sion, JJ, Security of Cama Hospitals at Ventilator | केईएम, सायन, जे.जे., कामा रुग्णालयांची सुरक्षा व्हेंटिलेटरवर

केईएम, सायन, जे.जे., कामा रुग्णालयांची सुरक्षा व्हेंटिलेटरवर

Next

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांची कुमक पालिका रुग्णालयात नियुक्त केली. येथे राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, पालिकेचे सुरक्षारक्षक व राज्य सुरक्षारक्षक मंडळाच्या रक्षकांमधून विस्तव जात नाही. पालिकेच्या केईएम आणि सायन रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेºयांची यंत्रणा अपुरी आहे. रुग्णालयांत मेटल डिटेक्टर नाहीत, काही ठिकाणी ते उपलब्ध असले तरीही बंद आहेत.
राज्य शासनाच्या जे.जे. आणि कामा रुग्णालयात राज्याप्रमाणेच देशाच्या कानाकोपºयातून रुग्ण उपचारांसाठी येत असतात. बाह्यरुण विभागात रोज हजारो रुग्णांची वर्दळ असते. रुग्णालयांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा मुख्य इमारतीमध्ये नियुक्त खासगी सुरक्षारक्षक हे केवळ मदतनीसांची भूमिका बजावतात.
या रुग्णालयांमध्ये येणारे बरेचसे रुग्ण मुंबईबाहेरचे असतात. निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारातच बस्तान मांडतात. रुग्णालयातील प्रसाधनगृहात स्नान करून रुग्णालय परिसरातच राहतात. त्यामुळे बºयाचदा रुग्णालयाच्या परिसरात किंवा मजल्यांवर बेवारस बॅगा, कपड्यांची गाठोडी दिसून येतात. बºयाचदा महिनोन्महिने त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. मात्र यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था वाºयावर आहे. या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन घटना घडल्यास अलार्म यंत्रणेदेखील नाही.
गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र या रुग्णालयाच्या मागील परिसरात रहिवासी चाळ असल्याने तेथे अनेक अरुंद पायवाटा असून हा मार्ग असुरक्षित आहे.
केईएममध्ये दररोज ३००० च्या आसपास तर सायन रुग्णालयातही जवळपास तेवढेच रुग्ण उपचारासाठी येतात. प्रत्येक रुग्णासोबत किती नातेवाइकांना प्रवेश द्यायचा यावर मर्यादा तर नाहीच, मात्र त्यांच्याकडे काय आहे? ते कुठून आले आहेत, याचीही नोंद तेथे होत नाही. प्रवेशद्वारापाशी तैनात सुरक्षा अधिकारी केवळ गाड्यांसाठी गेट खोलण्याचे आणि बंद करण्याचे काम करताना दिसतात.
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही मेटल डिटेक्टर मशीनला सामोरे जावे लागत नाही. जरी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षारक्षकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकी उपलब्ध असले तरी यातील किती कार्यरत आहेत, याबाबत शंकाच आहे.

- केईएममध्ये दररोज ३००० च्या आसपास तर सायन रुग्णालयातही जवळपास तेवढेच रुग्ण उपचारासाठी येतात. प्रत्येक रुग्णासोबत किती नातेवाइकांना प्रवेश द्यायचा यावर मर्यादा तर नाहीच, मात्र त्यांच्याकडे काय आहे? ते कुठून आले आहेत, याचीही नोंद होत नाही.

- गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक आहेत. मात्र रुग्णालयाच्या मागील परिसरात रहिवासी चाळ असल्याने तेथे अनेक अरुंद पायवाटा आहेत, ज्या मागच्या बाजूच्या रस्त्यावर बाहेर पडतात. त्यामुळे या पायवाटा असुरक्षित आहेत.

Web Title:  KEM, Sion, JJ, Security of Cama Hospitals at Ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.