Kathua Rape Case: Why you Did not Helped her ?, Jitendra Awhad Questioning to God | Video : Kathua & Unnao Rape Case :हे देवा,तुझ्या मंदिरात बलात्कार झाला,तू कुठे आहेस?; जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल
Video : Kathua & Unnao Rape Case :हे देवा,तुझ्या मंदिरात बलात्कार झाला,तू कुठे आहेस?; जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल

मुंबई - कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उन्नावमध्ये एका तरुणीवरही सामूहिक बलात्कार करण्यात आला असून याप्रकरणी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेनगरला अटक करण्यात आली आहे. या घटनांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही थेट देवाला प्रश्न विचारुन या घटनांबाबत आपला राग व्यक्त केला आहे.

ए देवा तू कुठे आहेस? हरवलायस की कंटाळून निघून गेलास? तुला माहितीये काय झालं? तुझ्या मंदिरात काश्मीरमधल्या कठुआमध्ये तुझ्या मंदिरात 8 दिवस माझ्या मुलीवरती... या देशाच्या मुलीवरती 8 दिवस बलात्कार झाला. देवा तू तिला मदत करायला तिथे नव्हतास... असे म्हणतात प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तुझ्यात प्राण येतो, तू जिवंत होतोस अरे, तू जिवंत असून पण ती पोरगी तुझ्यासमोर मेली. तुला तिच्यावरचं संकट दिसलं नाही देवा?... देवा तिची चूक काय? देव आहे की नाही हा प्रश्न पडतोय रे मला?, असा राग व्यक्त करत आव्हाडांनी भाजपा सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.  

उन्नाव सामूहिक बलात्कारासंदर्भातही आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.  'लोकशाहीच्या मंदिरातील रक्षकच बलात्कार करत आहेत', अशा शब्दांत भाजपावर बोचरी टीका केली आहे.

व्हिडीओ :

 


Web Title: Kathua Rape Case: Why you Did not Helped her ?, Jitendra Awhad Questioning to God
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.