तनुश्री दत्ताच्या तक्रारीवरून तपास सुरू; नाना आज मांडणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:15 AM2018-10-08T06:15:48+5:302018-10-08T06:16:09+5:30

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर २००८ मध्ये नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता. त्यानंतर शनिवारी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून पाटेकरसहित नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दिकी आणि मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध तिने तक्रार दिली

Investigation on the complaint of Tanushree Dutta; Nana today's role to play | तनुश्री दत्ताच्या तक्रारीवरून तपास सुरू; नाना आज मांडणार भूमिका

तनुश्री दत्ताच्या तक्रारीवरून तपास सुरू; नाना आज मांडणार भूमिका

googlenewsNext

मुंबई : ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर २००८ मध्ये नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता. त्यानंतर शनिवारी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून पाटेकरसहित नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दिकी आणि मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध तिने तक्रार दिली. या तक्रार अर्जाची ओशिवरा पोलीस शहानिशा करत असून, अधिक तपास सुरू आहे.
ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना १० वर्षांपूर्वीची आहे. त्यानुसार संबंधितांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच व्हिडीओ मिळविण्याचे काम सुरू आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घटनाक्रमाचा आढावा घेण्यात येत आहे. त्या वेळी सेटवर असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे. तक्रार अर्जाची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दुसरीकडे तनुश्रीच्या आरोपांवर ८ आॅक्टोबर रोजी पाटेकर, आचार्य आणि सिद्दिकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये पाटेकर पहिल्यांदाच उघडपणे बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे स्वरूप येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेकडे पोलिसांचेही लक्ष असणार आहे.

Web Title: Investigation on the complaint of Tanushree Dutta; Nana today's role to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.