परदेशी प्रवाशांना होणार भारतीय संस्कृतीची ओळख, मुंबई विमानतळाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:11 AM2019-07-01T03:11:48+5:302019-07-01T03:12:02+5:30

मुंबई विमानतळावरून दरवर्षी ४ कोटी ८० लाख प्रवासी प्रवास करतात त्यांच्यापर्यंत ही संस्कृती पोचवण्याचा प्रयत्न या कार्निव्हलच्या माध्यमातून केला जात आहे.

Introduction of Indian Culture to Foreign Travelers, Mumbai Airport Initiative | परदेशी प्रवाशांना होणार भारतीय संस्कृतीची ओळख, मुंबई विमानतळाचा पुढाकार

परदेशी प्रवाशांना होणार भारतीय संस्कृतीची ओळख, मुंबई विमानतळाचा पुढाकार

मुंबई : राज्याच्या, देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणाºया विविध प्रवाशांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची तोंडओळख व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुढाकार घेतला आहे. टर्मिनल २ (टी २) मध्ये ‘जया हे’ उपक्रमाद्वारे राज्याच्या संस्कृतीची ओळख करून देण्यात येत आहे.
मुंबई विमानतळावरून दरवर्षी ४ कोटी ८० लाख प्रवासी प्रवास करतात त्यांच्यापर्यंत ही संस्कृती पोचवण्याचा प्रयत्न या कार्निव्हलच्या माध्यमातून केला जात आहे. ‘जया हे’ या कार्निव्हलमध्ये महाराष्ट्राची कला, संस्कृती, राज्याच्या समृद्ध वारशाबाबत माहिती देण्यात येत असून प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पाऊलखुणा या नावाने जया हे कार्निव्हल सुरू करण्यात आले असून ते ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. राज्याची पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोकनृत्य, लोकसंगीत, कथाकथन, सेल्फी पॉइंट, कलाप्रदर्शन, योगबाबत माहिती देणारे दालन याचा यामध्ये समावेश आहे.
जया हे म्युझियमच्या माध्यमातून राज्याच्या संपन्न सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात येत आहे. कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा
या महाराष्ट्राच्या विविध भागांची माहिती देऊन प्रत्येक ठिकाणची वेगळी, स्वतंत्र ओळख याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, सातारामधील युनेस्कोची मोहर उमटलेली व्हॅली आॅफ फ्लॉवर्स, मराठा व मुघल काळातील विविध किल्ले, सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिंदू, बौद्ध व जैन गुहा, ऐतिहासिक लोणार तलाव, वारली कला यासह विविध बाबींची ओळख करून दिली जात आहे. जगभरातून मुंबई विमानतळावर येणा-या प्रवाशांना याद्वारे महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत अवगत केले जात आहे.
विमानतळावरून प्रवास करणाºया प्रवाशांना याचा लाभ घेता येणे सहज शक्य असून ज्या प्रवाशांना संस्कृतीबाबत माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा आहे अशांची पावले याकडे आपसूकच वळू लागली आहेत.

Web Title: Introduction of Indian Culture to Foreign Travelers, Mumbai Airport Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई