भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 08:18 AM2018-03-29T08:18:55+5:302018-03-29T08:18:55+5:30

पसंतीच्या भाषेमध्ये इंटरनेट उपलब्ध केले तर संभाव्य 205 दशलक्ष इंटरनेट नॉन-युजर डिजिटल होण्याची शक्यता आहे

internet users will increase if they have access in regional language ... | भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय

भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय

Next

नवी दिल्ली : युजरच्या पसंतीच्या भाषेमध्ये इंटरनेट उपलब्ध केले तर संभाव्य 205 दशलक्ष इंटरनेट नॉन-युजर डिजिटल होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि कंटर आयएमआरबी यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या “इंटरनेट इन इंडिक 2017” या अहवालात नमूद केला आहे.  भारतातील 481 दशलक्ष इंटरनेट युजरपैकी 335 दशलक्ष युजर इंटरनेट इन इंडिकचे नॉन-युनिक युजर असून, त्यापैकी 193 दशलक्ष अर्बन भारतातील नॉन-युनिक युजर (58%) आहेत आणि 141 दशलक्ष ग्रामीण भारतातील नॉन-युनिक युजर (42%) आहेत. नॉन-युनिक या संकल्पनेचा अर्थ असा, हे युजर केवळ इंडिकमध्येच इंटरनेटचा वापर करतात; तसेच त्यांच्या वापराचा केवळ लहान भाग इंडिकमध्ये असतो.

अहवालातील निष्कर्षांच्या मते, ग्रामीण भारतामध्ये इंडिक कंटेंट वापरणाऱ्यांची संख्या तुलनेने उच्च (76%) असल्याचे दिसून येते, तर शहरी भारतात अंदाजे 66% इंटरनेट युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात. सामाजिक-आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांमध्ये इंडिक कंटेंटचा वापर सर्वाधिक केला जातो आणि शहरी व ग्रामीण भारत या दोन्ही ठिकाणी एसईसी डी/ईचे अंदाजे 80% युजर इंडिक कंटेंट वापर असल्यातून ते दिसून येते.   इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 75% युजर व ग्रामीण भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 85% युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात.
 
शहरी भारतात इंडिकचा वापर कटाक्षाने मनोरंजनाच्या म्युझिक/व्हीडिओ स्ट्रीमिंग न्यूज व अन्य स्वरूपातील मनोरंजन अशा विविध स्वरूपांमध्ये मर्यादित आहे. सरासरी, इंडिकमधील इंटरनेटच्या एकूण वापरापैकी 70% वापर असा उपक्रमांसाठी मर्यादित आहे. 
तुलना करता, ऑनलाइन बँकिंग, नोकरीचा शोध किंवा तिकीट बुकिंग (जी भारतातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स सुविधा आहे) अशा महत्त्वाच्या सेवांच्या बाबतीत अजूनही लोकल कंटेंटचा वापर कमी होत असल्याचे दिसते (20% हून कमी). इंटरनेट युजरसाठी सर्रासपणे पहिला वापर असलेला सर्च इंजिनचा वापरही इंडिकमध्ये केवळ 39% केला जातो. आयएएमएआयच्या मते, यातून इंडिकमधील अशा महत्त्वाच्या इंटरनेट सेवांना असलेल्या मर्यादा लक्षात येतात व त्यामुळे ग्रामीण भारतात व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गात इंटरनेटचा प्रसार होण्यावर निर्बंध येतात.  इंडिकमधील इंटरनेट 23% इंटरनेट नॉन-युजरना डिजिटल होण्यासाठी महत्त्वाचा प्रेरक घटक आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. म्हणजेच, भारतात इंडिकमधील इंटरनेट कंटेंटचा प्रसार केल्यास अंदाजे 205 दशलक्ष नवे इंटरनेट युजर वाढू शकतात.

जगभर, चीनने इंटरनेट कंटेंटसाठी मँडरिन लिपीचा वापर करून इंटरनेट युजरची सर्वाधिक संख्या नोंदवली आहे. ही संख्या इतकी आहे की इंटरनेटवर चायनिज ही इंग्रजीनंतरची दुसऱ्या क्रमांकांच सर्वात लोकप्रिय भाषा आहे. याउलट, जगभरातील इंटरनेट कंटेंटमध्ये इंडिक कंटेंटचे प्रमाण जेमतेम 0.1% आहे. आयएएमएआयने म्हटले आहे की, डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिकमध्ये अधिकाधिक इंटरनेट सेवा देईल, इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढवेल व भारतातील सामाजिक-आर्थिक बाबतीत कमकुवत असलेल्या वर्गाला खऱ्या अर्थाने सक्षम करेल अशी इंडिक इंटरनेट सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. 

 

Web Title: internet users will increase if they have access in regional language ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.