International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:47 AM2019-06-21T01:47:48+5:302019-06-21T01:48:40+5:30

जवळपास ७०० हून अधिक शेतकऱ्यांना योग प्रशिक्षण

International Yoga Day: 'The lessons of Yogavita given to farmers' | International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’

International Yoga Day: ‘शेतकऱ्यांनाही दिले योगविद्येचे धडे’

googlenewsNext

- स्नेहा मोरे 

मुंबई : दरवर्षी २१ जून रोजी साजºया केल्या जाणाºया जागतिक योग दिनाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. परस्पर सहचर्य, तरुणाई, शांती अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन मागील चार वर्षे अत्यंत यशस्वीपणे हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी जागतिक योग दिनाची ‘सुदृढ हृदयासाठी योग’ संकल्पना आहे, त्यानिमित्त द योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांच्याशी केलेली बातचीत...

आपल्या योग केंद्राने यंदा कोणते महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले?
गेल्या वर्षभरात योग केंद्राने देशभरातील शेतकऱ्यांसाठी योगाचे विशेष वर्ग घेतले, त्यांना प्रशिक्षण दिले. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी हा विशेष कार्यक्रम केंद्राने हाती घेतला होता. त्याअंतर्गत जवळपास ७०० हून अधिक शेतकºयांना योग प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणांतर्गत नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग समुपदेशन आणि योग हा विशेष कार्यक्रम शेतकºयांसाठी तयार करण्यात आला. परिणामी गेल्या वर्षभरात सातशे शेतकºयांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल झालेले दिसून आले. केंद्राचे विशेष प्रशिक्षक या अंतर्गत शेतकºयांच्या घराघरात पोहोचून हे प्रशिक्षण देत आहेत. याखेरीज वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी योगवर्ग घेत आहोत. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांकरिताही योग कार्यक्रम राबवीत आहोत.

गेल्या काही वर्षांत तरुण पिढीत ताणतणाव वाढतोय तो कमी करण्यास योगसाधना कशी मदत करते?
देशातील महानगरांमध्ये आता योग पोहोचला आहे. मात्र कॉर्पोरेट सेक्टरमधील तरुणाई ही दोन तास योग करून ‘वीकेण्ड कल्चर’ एन्जॉय करणारी आहे. या वीकेण्डच्या कल्चरमुळे तरुण पिढीमध्ये अधिक ताण-तणाव वाढत आहे, त्यात मग काम, वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंध या सर्व जबाबदाºया आणि अपेक्षांमुळे आपले शरीर हे यंत्र बनले आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतुलन असणे गरजेचे आहे. शरीराचे यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपले मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. रोज योग-ध्यानधारणा केल्यास निश्चित फरक पडेल. ध्यान करताना स्वतंत्र खोली, शांत वातावरण असेल तर उत्तम. आजच्या काळात ते मिळणे अवघड आहे. मात्र, किमान टीव्ही, मोबाइल, गोंधळ नसावा हे पाळावे.

सर्व वयोगटांतील वाढत्या मानसिक समस्या योगाने नियंत्रित करता येतील का?
निश्चितच येतील; वाढता मानसिक ताण हा नैराश्याकडे नेतो आणि त्यातून बºयाचदा चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टी घडतात. त्यामुळे मानसिक समस्यांची लक्षणे ओळखून वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. शिवाय, औषधोपचारांसह योग आणि ध्यानधारणेमुळे सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल. योग आणि ध्यानातून मिळणाºया ऊर्जेमुळे शारीरिक विश्रांती, मनाला येणारी उभारी यामुळे ताण-तणावमुक्त राहता येते.

योग नेमका केव्हा आणि किती वेळ करावा याचे काही ठरावीक नियम आहेत का?
सर्वसाधारणपणे दिवसाच्या सुरुवातीला पंधरा मिनिटे योग साधना करावी. दिवसातून दोनदा योग साधना करावी. एखाद वेळेस मानसिक ताण जास्त असल्यास आणखी एकदा योग करण्यास काही हरकत नाही. त्याचे काहीही दुष्परिणाम नाहीत. शक्यतो दिवसाच्या सुरुवातीला पहाटे योग केल्यास दिवसभराच्या ताण-तणावाला खंबीरपणे सामोरे जाता येते. मात्र आजच्या रहाटगाड्यात ते शक्य न झाल्यास रात्री झोपताना योग करण्यास हरकत नाही. प्रत्याहार, ध्यानधारणा आणि समाधी हे योगाचे मुख्य टप्पे आहेत. यात मनन, चिंतन आणि स्वनिरीक्षण करीत आत्मसाधनेत लीन होता येते.

Web Title: International Yoga Day: 'The lessons of Yogavita given to farmers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.