‘भारतीय युवांनी तंदुरुस्त राहावे’- सचिन तेंडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:23 IST2017-07-19T03:23:05+5:302017-07-19T03:23:05+5:30
भारत युवा देश असून आज देशातील युवांनी क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तंदुरुस्त राहावे. युवा आणि आजारी किंवा कमजोर लोकसंख्या देशासाठी कायम घातक

‘भारतीय युवांनी तंदुरुस्त राहावे’- सचिन तेंडुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत युवा देश असून आज देशातील युवांनी क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तंदुरुस्त राहावे. युवा आणि आजारी किंवा कमजोर लोकसंख्या देशासाठी कायम घातक ठरेल, असे वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केले.
एका आघाडीच्या क्रीडा वाहिनीने नुकताच सचिनला आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. या कार्यक्रमामध्ये सचिनने म्हटले की, ‘२०२० सालापर्यंत भारत लोकसंख्येच्या दृष्टीने युवा देश बनेल. युवा आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत कमजोर लोकसंख्या देशासाठी घातक ठरेल. यासाठी युवांनी अधिकाधिक क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होणे, हे भारतासाठी लाभदायक ठरेल.’ त्याचप्रमाणे, ‘क्रीडा माझे जीवन असून ते माझ्यासाठी आॅक्सिजनप्रमाणे आहे. अनेक जण या क्षेत्राला व्यवसाय म्हणतात, पण मला ते आवडत नाही. क्रीडा माझ्यासाठी सर्वस्व आहे,’ असेही सचिनने या वेळी म्हटले.
या विश्वचषकविषयी सचिन म्हणाला की, ‘या स्पर्धेतही आपल्याला जागतिक स्तराचे खेळाडू पाहण्यास मिळतील. कोणत्याही खेळातील विश्वचषक स्पर्धेत खेळाडू तडजोड करत नाही आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला, संघाला कोणत्याही प्रमाणात संधी देत नाही. इतर खेळाप्रति जोरदार पाठिंबा दर्शविण्याची संधी भारतीयांना या स्पर्धेद्वारे मिळाली आहे.’