अनुसूचित जातींसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:34 AM2018-11-06T06:34:46+5:302018-11-06T06:35:08+5:30

मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

 Increase in income limit for scheduled castes | अनुसूचित जातींसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

अनुसूचित जातींसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

Next

मुंबई  - मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
या आधी पालकांची उत्पन्न मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये इतकी होती. आता २.५० लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सामाजिक न्याय विभागाने सोमवारी या बाबतचा आदेश काढला.
दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यांमध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांकरता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी काढला. ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा शुल्क माफी मिळालेली आहे, जे विद्यार्थी त्याच परीक्षेस दुसऱ्यांदा बसलेले आहेत, बहिशाल आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात राहतात, नोकरी-व्यवसाय करतात परंतु, त्यांच्या नावे गावी शेतजमीन आहे त्यांना ही सवलत लागू नसेल.

Web Title:  Increase in income limit for scheduled castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.