जीएसटीतील सुधारणांमुळे आधी लगीन आयजीएसटी क्रेडिटचे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:36 AM2019-02-18T03:36:36+5:302019-02-18T03:36:55+5:30

करनीती २७३

IGST credits made earlier due to GST improvements | जीएसटीतील सुधारणांमुळे आधी लगीन आयजीएसटी क्रेडिटचे

जीएसटीतील सुधारणांमुळे आधी लगीन आयजीएसटी क्रेडिटचे

Next

सी. ए. उमेश शर्मा

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, शिवजयंती निमित्ताने जीएसटीत करदात्याला काय नविन आदेश आहे़ सरकारने नुकतेच जीएसटी कायद्यामध्ये सुधारणा आणल्या आहेत, त्याचप्रमाणे १ फेब्रुवारी २०१९ पासून काय बदल लागू करण्यात आले?

कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जसे आधी लगीन कोंडाण्याचे असे आदेश आले होते तानाजींना तसेच आता करदात्याला आधी वापर आयजीएसटी क्रेडिटचे असा आदेश करदात्याला झाला आहे. जीएसटी कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आले आहे़ तर आपण यातील सुधारणा व बदल कलम ४९ मध्ये नवीन तरतूद ४९ अ तसेच ४९ ब च्या संदर्भात बघुयात़
अर्जुन : कृष्णा, आयजीएसटीच्या क्रेडिटच्या उपयोगितेत काय बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, इन्टिग्रेटेड म्हणजेच आयजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी आयजीएसटीचे संपूर्ण क्रेडिट वापरल्यानंतरच केंद्रीय म्हणजेच सीजीएसटी, स्टेट म्हणजेच एसजीएसटी/युटीजीएसटी क्रेडिट वापरले जाऊ शकते़ हे करदात्याने गंभीरपणे लक्षात ठेवावे़
अर्जुन : कृष्णा, सीजीएसजीटीच्या क्रेडिटच्या उपयोगितेत काय बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, सीजीएसटीचे क्रेडिट आधी आयजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी वापरले जाईल आणि नंतर उरलेले क्रेडीट सीजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी वापरले जाईल़
अर्जुन : कृष्णा, एसजीएसजीटीच्या क्रेडिट उपयोगितेमध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, एसजीएसटीचे क्रेडिट आधी आयजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी वापरले जाईल. आणि नंतर उरलेले क्रेडिट एसजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी वापरले जाईल़
अर्जुन : कृष्णा, कुठले जुने नियम लक्षात ठेवण्यासारखे आहे?
कृष्ण : अर्जुना, जुने पण अजुनही रूढ असणारे नियम असो की सीजीएसटीचे दायित्व एसजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी वापरले जाऊ षकत नाही तसेच त्याउलट ही शक्य नाही़
अर्जुन : कृष्णा, १ फेब्रुवारी २०१९ आधीच्या जुन्या क्रेडिटला हा नियम लागू होईल का?
कृष्ण : अर्जुना, जुन्या क्रेडिटला
हे लागू होणार नाही परंतु
जीएसटीएन कॉम्प्युटर प्रणाली हे कसे करेल हे देवच जाणो़ ज्यांचे रिटर्न पेडिंग आहेत त्यांना याचा त्रास
होऊ नये़

अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, करदात्याने आधी वर्चस्व देऊन आयजीएसटीचे क्रेडिट वापरावे़ नंतर सीजीएसटी/एसजीएसटीेचे क्रेडिट गरजेनुसार वापरले जाऊ शकते़ खूप मोठा बदल आहे करदात्याला लक्षात ठेवावे लागेल की आधी लगीन आयजीएसटी क्रेडिटचे़

 

Web Title: IGST credits made earlier due to GST improvements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी