"स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 08:46 PM2018-10-18T20:46:43+5:302018-10-18T20:46:56+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दस-या मेळाव्याच्या निमित्तानं मोदी सरकारवर निशाणा साधला.

"If Savarkar was PM, Pakistan Existence Will not remain" | "स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता"

"स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता"

Next

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दस-या मेळाव्याच्या निमित्तानं मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानवरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचं नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचं राजकारण करता आहात. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्य दुष्काळाने होरपळतोय. हीच परिस्थिती कर्नाटकात आहे. आमच्या राज्यात अभ्यास वगैरे चालू आहे. पण तिकडे कर्नाटक सरकारने जुन्याच निकषाने दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. भाजपाचे सगळे नेते आता पाच राज्यांमध्ये प्रचाराला जातील आणि मतं मागतील. निवडणूक जिंकल्यावरही तरी महागाई कमी होणार का?, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

देशात महिला सुरक्षित नाहीत. संघाच्या कार्यक्रमात बोलताना कैलास सत्यर्थी म्हणाले, या देशात महिलांची किंमत नाही. या देशात जर महिलांना किंमत नाही तर मग सत्तेत येऊन काय फायदा, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

Web Title: "If Savarkar was PM, Pakistan Existence Will not remain"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.