माफी मागितली नाही तर रस्त्यावर उतरू, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाभिक समाज नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:03 IST2017-11-17T00:03:21+5:302017-11-17T00:03:41+5:30
पुणे येथील दौंडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाचा दाखला दिल्याने

माफी मागितली नाही तर रस्त्यावर उतरू, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाभिक समाज नाराज
मुंबई : पुणे येथील दौंडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाचा दाखला दिल्याने सलून व ब्यूटी पार्लर असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी समाजाची माफी मागण्याची मागणी केली आहे.
सिंचन घोटाळ्यासह रखडलेल्या प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासित करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाचे उदाहरण दिले. मात्र एका प्रगत समाजाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यवसायावरून आक्षेपार्ह भाषा वापरणे चुकीचे असल्याचे मत असोसिएशनने व्यक्त केले आहे.