मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केट विषयी प्रशिक्षणाची आखणी करावी, सामाजिक न्यायमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 05:12 PM2017-12-06T17:12:39+5:302017-12-06T17:13:04+5:30

 मागासवर्गीय तरुणांना शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य प्राप्त होऊन त्यांना रोजगारक्षम करण्यास तसेच त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत.

The idea of ​​social justice should be planned for backward classes for the share market | मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केट विषयी प्रशिक्षणाची आखणी करावी, सामाजिक न्यायमंत्र्यांचे निर्देश

मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केट विषयी प्रशिक्षणाची आखणी करावी, सामाजिक न्यायमंत्र्यांचे निर्देश

Next

मुंबई: मागासवर्गीय तरुणांना शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य प्राप्त होऊन त्यांना रोजगारक्षम करण्यास तसेच त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मागासवर्गीय तरुणांना पारंपरिक उद्योग व्यवसायाबरोबरच शेअर मार्केट संदर्भातील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या तरुणांना म्युचअल फंड, शेअर ब्रोकर्स व शेअर मार्केट संबंधातील विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई शेअर मार्केटने विविध अभ्यासक्रम तयार करावेत, ग्रामीण मुलांना शेअर मार्केट संदर्भातील प्रशिक्षण घेता यावे यासाठी जिल्हा पातळीवर निवासी कोर्सेस तयार करावेत, असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे राजकुमार बडोले यांनी सांगितले.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट संबंधातील प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बडोले बोलत होते. या बैठकीस मुंबई शेअर मार्केटचे अध्यक्ष आशिष चौहाण, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, सह सचिव डींगळे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: The idea of ​​social justice should be planned for backward classes for the share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.