हॉलतिकीट नसताना रेल्वेच्या परीक्षेला बसणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:44 AM2018-09-18T05:44:20+5:302018-09-18T05:44:36+5:30

परीक्षांचे हॉलतिकीटच विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी आणि कुठे, याबाबत विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे.

How to sit for Railway exam without halalikit? | हॉलतिकीट नसताना रेल्वेच्या परीक्षेला बसणार कसे?

हॉलतिकीट नसताना रेल्वेच्या परीक्षेला बसणार कसे?

Next

मुंबई : रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा सुरू झाल्या असून, आॅक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने होतील. मात्र, या परीक्षांचे हॉलतिकीटच विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी आणि कुठे, याबाबत विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे.
रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून ६३ हजार पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले आहेत. यापैकी मुंबईतून सेंट्रल रेल्वे झोनसाठी २,३२१ जागांसाठी ही परीक्षा होईल. आॅनलाइन होणाºया या परीक्षा महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, मुंबईसह इतर परीक्षा केंद्रांवर घेण्यात येतील. यासाठी आवश्यक हॉलतिकीट, सेंटर कोड आदी सर्व संकेतस्थळावरच परीक्षेच्या ४ दिवस आधी जाहीर करण्यात येणार होते. मात्र, हॉलतिकीट ज्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार होते, ते संकेतस्थळच मागील ४ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. मुंबईतीलच नाही, तर राज्यभरातील विद्यार्थी तक्रारी करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे बोर्डाच्या विभागीय कार्यालयात अधिकाºयांची या संदर्भात भेट घेतली. तेव्हा परीक्षा टप्प्याटप्प्याने होईल. त्यामुळे परीक्षेच्या तारखेच्या आधी हॉलतिकीट मिळेल. त्यानंतरच त्यांची परीक्षा होईल, असे रेल्वे बोर्डाने सांगितले.

तक्रार निवारणासाठी सुविधा नाही
रेल्वेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येत असूनही विद्यार्थ्यांना याबाबत अधिक माहितीसाठी कोणताही हेल्पलाइन क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे या संदर्भात नेमकी तक्रार कोणाकडे करायची किंवा मार्गदर्शन कोण करेल, यासंबंधी विद्यार्थी अनभिज्ञ आहेत.

Web Title: How to sit for Railway exam without halalikit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.