‘उद्दाम’ प्रतिवादी दाम्पत्यास हायकोर्टाचा २५ लाख दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:40 AM2019-01-20T04:40:58+5:302019-01-20T04:41:13+5:30

गोत्यात आणण्याची धमकी देणा-या प्रतिवादी दाम्पत्यास तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून चांगलेच वठणीवर आणले.

High Court's 25 million fine for 'indescribable' respondent | ‘उद्दाम’ प्रतिवादी दाम्पत्यास हायकोर्टाचा २५ लाख दंड!

‘उद्दाम’ प्रतिवादी दाम्पत्यास हायकोर्टाचा २५ लाख दंड!

Next

मुंबई: न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या ‘कोर्ट रीसिव्हर’ कर्मचाऱ्यांच्या कामत अडथळे आणून त्यांना विनयभंगाची खोटी फिर्याद नोंदवून गोत्यात आणण्याची धमकी देणा-या प्रतिवादी दाम्पत्यास तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून चांगलेच वठणीवर आणले.
नेहा गणधीर आणि त्यांचे पती पुनित गणधीर यांनी दाव्याच्या खर्चापोटी २५ लाख रुपयांची रक्कम फेब्रुवारीअखेरपर्यंत तीन हप्त्यांत जमा करावी. यापैकी पाच लाख रुपये दाव्यातील वादीला तर बाकीचे १० लाख रुपये टाटा मेमेरियल ट्रस्टच्या कर्करोग इस्पितळास दिले जावेत, असा आदेश न्या. एल. जे. काथावाला यांनी दिला.
नेहा गणधीर या खोकल्यावरील औषधे बनविणाºया फील गूड इंडिया कंपनीच्या मालक असून त्यांचा कारखाना हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात हुडा येथे आहे. त्यांच्या मालाची विक्री मुंबईतील वरळी येथील नरेंद्र मार्केर्टिंग ही कंपनी करते.
दाद-खाज-खुजली आणि अन्य विकारांवरील औषधे तयार करणाºया मे. सपट अ‍ॅण्ड कंपनी (बॉम्बे) प्रा. लि. या कंपनीने गणधीर यांच्या कंपनीविरुद्ध कॉपीराइटचा भंग केल्याबद्दल दिवाणी दावा दाखल केला आहे. घणधीर यांची कंपनी बाटल्यांना हुबेहूब आपल्या कंपनीच्या बाटल्यांसारखी लेबले लावून त्यांचे खोकल्यावरील औषध विकते असा सपट कंपनीचा आरोप आहे.
या दाव्यात अंतरिम आदेश देताना न्या. काथावाला यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ‘कोर्ट रीसिव्हर’ची नेमणूक केली होती व ‘कोर्ट रीसिव्हर’ने प्रतिवादी कंपनीतून सर्व आक्षेपार्ह माल जप्त करून सील करावा, असे निर्देश दिले होते. यानुसार ‘कोर्ट रीसिव्हर’चे दोन अधिकारी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन हरियाणात हुडा येथील कारखान्यात गेले होते. तेव्हा त्यांना ताटकळत ठेवत गणधीर दाम्पत्याने आक्षपार्ह माल कारखान्यातून बाहेर काढून टेम्पोने अन्यत्र रवाना केला. एवढेच नव्हे तर या दाम्पत्याने शारीरिक बळाचा वापर करून ‘कोर्ट रीसिव्हर’च्या कामात अडथळे आणले. एवढेच नव्हे तर नेहा गणधीर यांनी कोर्टाचे अधिकारी गुमान निघून गेले नाहीत तर विनयभंगाची खोटी फिर्याद करून त्यांनाच आत टाकण्याची धमकीही दिली.
‘कोर्ट रीसीव्हर’ने अहवाल सादर करून झाला प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणला. गणधीर दाम्पत्याने न्यायालयात येऊन झाल्या प्रकाराची कबुली दिली. रागाच्या भरात आपण विनयभंगाची धमकी दिली, अशी लटकी सबब सांगून नेहा यांनी गयावाया केली. प्राप्त परिस्थितीत आपल्याला तुरुंगवासही होऊ शकतो, असे दिसल्यावर या उद्दाम दाम्पत्याने दिलगिरी व्यक्त करून पैसे भरण्याची तयारी दर्शविली.
>कोर्टाचा कडक पवित्रा
न्या. काथावाला यांनी नमूद केले की, दिवाणी दाव्यांमध्ये न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तरी फारसे काही बिघडत नाही, असा समज करून घेऊन पक्षकारांनी आदेश न पाळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना खंबीरपणे आळा घालण्याची गरज आहे. या प्रकरणात तर प्रतिवादीने महिला असल्याचा गैरफायदा घेत न्यायालयाच्या अधिकाºयांना धमकावण्यापर्यंत मजल मारली. त्यांना जरब बसविल्याशिवाय त्यांच्यासारख्या इतरांचे डोळे उघडणार नाहीत.

Web Title: High Court's 25 million fine for 'indescribable' respondent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.