मॉडेल मानसी दीक्षितची हत्या, आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:48 AM2018-10-17T09:48:32+5:302018-10-17T10:13:43+5:30

मालाड परिसरामध्ये सोमवारी (15 ऑक्टोबर) झालेल्या मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. पण काही तासांतच तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी आरोपी मुझम्मिल हसनच्या मुसक्या आवळल्या.

with the help of ola driver police had reached murderer of model mansi dixit | मॉडेल मानसी दीक्षितची हत्या, आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मॉडेल मानसी दीक्षितची हत्या, आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

मुंबई - मालाड परिसरामध्ये सोमवारी (15 ऑक्टोबर) झालेल्या मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. पण काही तासांतच तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी आरोपी मुझम्मिल हसनच्या मुसक्या आवळल्या. ओला ड्रायव्हरच्या तत्परतेमुळे पोलिसांना मानसीच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळालं. हा ओला ड्रायव्हर मानसी दीक्षित हत्याकांड प्रकरणातील साक्षीदारदेखील आहे. ज्याच्या गाडीतून मानसाचा मृतदेह असलेली बॅग झाडाझुडपात फेकण्यात आली होती. दरम्यान, मानसीची हत्या का करण्यात आली?, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

(मुंबईमध्ये मॉडेलची हत्या, बॅगमध्ये आढळला मृतदेह)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी आणि मुझम्मिलमध्ये कोणत्यातरी कारणांमुळे वाद झाला. या वादादरम्यान मुझम्मिलनं लाकडी टेबलावर तिचे डोके जोरात आपटले. यातच मानसीचा मृत्यू झाला. यानंतर मुझम्मिलनं तिचा मृतदेह बॅगमध्ये कोंबला,ओला बुक केली आणि ड्रायव्हरला एअरपोर्टच्या दिशेनं गाडी नेण्यास सांगितली. मध्येच त्यानं ड्रायव्हरला मालाडमध्ये गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी थांबल्यानंतर त्यानं झाडाझुडपात बॅग फेकली. 

त्यानंतर रिक्षा करुन तो कोठेतरी भलतीकडेच गेला. त्याच्या हालचालींवरुन ओला ड्रायव्हरला संशय आला, त्यानं तातडीनं पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी ड्रायव्हरकडून मुझम्मिलचा फोन नंबर घेतला. मोबाइल कंपनीकडून मागवण्यात आलेल्या तपशिलामध्ये मुझम्मिल हसनची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्याचे लोकेशन शोधून केवळ चार तासांत पोलिसांनी त्याला गजाआड केले.

मुझम्मिलने 3 वेळा बदललं ठिकाण
ड्रायव्हरनं पोलिसांना सांगितले की, ज्यावेळेस बॅग उचलण्यास मुझम्मिला मदत केली, त्यावेळेस संशय निर्माण झाला. बॅगमध्ये प्रमाणाबाहेर वजन असल्याचे जाणवत होते. अंधेरी (पश्चिम) येथील अल-ओहद इमारतीतून मुझम्मिलनं ओला बुक केली होती. जिथे मानसीची हत्या करण्यात आली होती. ड्रायव्हरनं असेही सांगितले की,  मुझम्मिलने ओला अॅपद्वारे जवळपास तीन वेळा ठिकाण बदललं. यानंतर दुपारी जवळपास 3.30 वाजण्याच्या सुमारास माईंडस्पेस मालाडकडे गाडी नेण्यास सांगितली आणि तिथे तिचा मृतदेह फेकला.

दरम्यान, मानसीची हत्या का करण्यात आली, यामागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.  

Web Title: with the help of ola driver police had reached murderer of model mansi dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.