ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 01:07 PM2018-01-13T13:07:18+5:302018-01-13T17:14:13+5:30

नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे.

Helicopter missing: Seven people chopped off, 30 choppy air traffic control from Mumbai | ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चार जणांचा मृत्यू

ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चार जणांचा मृत्यू

Next

मुंबई-  जुहू येथून सकाळी 10.20 वाजता उड्डाण केलेलं ओएनजीसीचे पवनहंस हेलिकॉप्टर सकाळी डहाणूजवळील समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून ओएनजीसीचे ५ कर्मचारी आणि २ पायलट होते. यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. जुहू येथून ओएनजीसीच्या ऑफशोर डेव्हलपमेंट एरियाकडे (ओडीए) निघालेल्या या हेलिकॉप्टरचा सकाळी एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. दरम्यान, नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून पंकज गर्ग असं या मृत कामगाराचं नाव आहे



 

हेलिकॉप्टरचा मुंबईपासून 30 नॉटिकल मैलावर गेल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. साडेदहा वाजेपर्यंत हे हेलिकॉप्टर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात होतं त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. दरम्यान, बेपत्ता झालेल्या सात जणाचं शोधकार्य सुरू झालं आहे. तब्बल साडे तीन तासांच्या शोधकार्यानंतर हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ सापडलं आहे. दरम्यान, चार जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळते आहे.



 



 

ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 चॉपर 2 पायलट्स व 5 प्रवाशांना घेऊन निघालं होतं. ओेएनजीसीच्या ७ अधिकाऱ्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरने जुहू येथून सकाळी १०.२० वाजता उड्डाण केलं. हे हेलिकॉप्टर मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळावर १०.५८ वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र, ते  नियोजीत वेळेत न पोहचल्याने ओनेजीसीने इंडियन कोस्ट गार्डला याबद्दलची माहिती दिली. मुंबईपासून समुद्रात ३० नॉटिकल माइल्स इतक्या अंतरावर गेल्यानंतर १०.३० वाजल्यापासून या हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क होऊ शकलेला नाही.

दरम्यान, बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर ओएनजीसीचंच आहे. कंपनीने करार केल्याने पवनहंस हेलिकॉप्टर पाच ते सहा वर्षांपासून ओएनजीसीसोबत काम करत आहे.

‘नौदल आणि तटरक्षक दल आपलं काम करीत असून त्यांच्या समन्वयासाठी मी मुंबईकडे निघालो आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली आहे. त्यांनी यात सहकार्याची भुमिका दाखवली असून नौदल आणि तटरक्षकदलाला यामध्ये पूर्णपणे सहकार्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांनी म्हंटलं. 



 

Web Title: Helicopter missing: Seven people chopped off, 30 choppy air traffic control from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.