तो बोलू शकला नाही, लॉकेटने केली कमाल; क्यूआर कोडमुळे सापडले मुलाचे पालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:46 AM2024-04-15T09:46:15+5:302024-04-15T09:47:07+5:30

दिव्यांग मुलाची पालकांशी भेट घालून दिली ती क्यूआर कोड असलेल्या लॉकेटने.

He could not speak, the locket did the utmost Child's parents found by QR code | तो बोलू शकला नाही, लॉकेटने केली कमाल; क्यूआर कोडमुळे सापडले मुलाचे पालक

तो बोलू शकला नाही, लॉकेटने केली कमाल; क्यूआर कोडमुळे सापडले मुलाचे पालक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात १२ वर्षीय दिव्यांग मुलगा फिरत होता. काही लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी त्याच्याशी बोलून घरचा पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो बोलू शकला नाही. अशा या दिव्यांग मुलाची पालकांशी भेट घालून दिली ती क्यूआर कोड असलेल्या लॉकेटने.

नागरिक त्याला पोलिसांकडे घेऊन गेले. पोलिसांनी तत्काळ इतर पोलिस ठाण्यांना अलर्ट पाठविला. मात्र, त्यातून काहीही हाती लागले नाही. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याचे लक्ष मुलाच्या गळ्यातील लॉकेटकडे गेले. लॉकेटवर एक क्यूआर कोड होता. तो मोबाइलवर स्कॅन केल्यावर एक फोन नंबर मिळाला. त्यावरून दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क झाला. पोलिसांनी संस्थेच्या संबंधितांशी बोलून मुलाचे वर्णन, त्याचा फोटो पाठवला हाेता.

Web Title: He could not speak, the locket did the utmost Child's parents found by QR code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई