खूशखबर... 'ब्लास्ट प्रूफ' गॅस सिलिंडर येतोय; मोठ्ठं टेन्शन मिटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:28 PM2019-02-28T12:28:04+5:302019-02-28T12:28:50+5:30

कॉन्सिडन्स पेट्रोलियम लिमिटेड, एलपीजी रिटेलर आणि टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड कंपनीच्या टेक्नॉलॉजीवर आधारित हे संशोधन विकसित झाले आहे.

Good news ... 'Blast proof' LPG gas cylinders are coming; Big tension will disappear! | खूशखबर... 'ब्लास्ट प्रूफ' गॅस सिलिंडर येतोय; मोठ्ठं टेन्शन मिटणार!

खूशखबर... 'ब्लास्ट प्रूफ' गॅस सिलिंडर येतोय; मोठ्ठं टेन्शन मिटणार!

googlenewsNext

मुंबई - गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अनेक दुर्घटना घडल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचलं आहे. मात्र, आता सिलिंडर स्फोटाच्या या भीतीपासून आपली सुटका होणार आहे. कारण, लवकरच आपणास ब्लास्ट प्रूफ घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातील किचन आणखी सुरक्षित होणार आहे.

कॉन्सिडन्स पेट्रोलियम लिमिटेड, एलपीजी रिटेलर आणि टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड कंपनीच्या टेक्नॉलॉजीवर आधारित हे संशोधन विकसित झाले आहे. गो गॅस ईलाईट या नावाने एलपीजीने मुंबईतून हा ब्लास्ट प्रूफ ब्रँड लाँच केला आहे. विशेष म्हणजे या सिलिंडरचे वजन हे पूर्वीच्या स्टीलच्या सिलिंडरच्या वजनापेक्षा कमी असून ते फायबरपासून बनवलेलं असेल, असे टेक्नोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले. तसेच अगोदरच्या सिलिंडरच्या तुलनेत हे फायबरपासून बनवलेलं गॅस सिलिंडर अधिक मजबूत आणि टिकाऊ असणार आहे. यामध्ये 100 टक्के सुरक्षेची खात्री देणारे युव्ही प्रोटेक्शन वापरण्यात आले आहे. कुठलेही एलपीजी गॅस सिलिंडर बाजारात येण्यापूर्वी त्यामधील 14 क्वालिटी पाँईंटची खात्रीशीर तपासणी करूनच त्यास प्रमाणपत्र दिले जाते. 
ब्लास्टप्रुफ असणारे नवीन कंम्पोसीट गॅस सिलिंडर हे जुन्या स्टीलच्या गॅस सिलिंडरपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी अधिक महाग असणार आहे. मात्र, स्टीलच्या सिलिंडरच्या तुलनेत हे टिकाऊ असून ते 20 वर्षांपर्यंत सहज टिकेल, असा दावा करण्यात येत आहे. तर, जुने स्टीलचे गॅल सिलिंडर हे 16 वर्षांपर्यंतच टिकते. 

दरम्यान, हलक्या वजनाच्या या ब्लास्ट प्रूफ सिलिंडरमुळे भारतीय गृहिणीचं किचन अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच अधिक स्वच्छ आणि नो टेंशन असणार आहे. सध्या याप्रकरचे नवीन 58 सिलेंडर तयार असून ते 22 राज्यांत पाठविण्यात येणार आहेत, असे कॉन्फिडन्स ग्रुपचे प्रमुख नितीन खरा यांनी सांगितले. 
 

Web Title: Good news ... 'Blast proof' LPG gas cylinders are coming; Big tension will disappear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.