कुर्ल्यात विवाहितेवर तिघांचा सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:51 AM2019-01-05T01:51:58+5:302019-01-05T01:52:24+5:30

थर्टी फर्स्टच्या रात्री शौचालयासाठी गेलेल्या विवाहितेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना कुर्ल्यात उघडकीस आली आहे.

gang rape in Kurla | कुर्ल्यात विवाहितेवर तिघांचा सामूहिक बलात्कार

कुर्ल्यात विवाहितेवर तिघांचा सामूहिक बलात्कार

googlenewsNext

मुंबई : थर्टी फर्स्टच्या रात्री शौचालयासाठी गेलेल्या विवाहितेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना कुर्ल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुक्तार शेख (३९), शाहीद आरीफ (४८) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
कुर्ला परिसरात ३० वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. थर्टी फर्स्टच्या रात्री ती घराजवळील सार्वजनिक शौचालयाकडे निघाली. एकटी बेसावध पाहून दारूच्या नशेत असलेल्या त्रिकूटाने तिला हेरले आणि एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या अवस्थेत महिलेने घर गाठले. याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. अखेर दोन दिवसांनंतर महिलेने याबाबत कुटुंबीयांना सांगितले आणि कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, एका आरोपीने पळ काढला, तर आरिफ आणि शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: gang rape in Kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.