तरुणीच्या हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:28 AM2019-01-22T01:28:12+5:302019-01-22T01:28:19+5:30

अंधेरीत आसमा निसार शेख (२५) या तरुणीची शनिवारी हत्या करण्यात आली होती.

Four investigations into the murder of the girl | तरुणीच्या हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

तरुणीच्या हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

Next

मुंबई : अंधेरीत आसमा निसार शेख (२५) या तरुणीची शनिवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, मृत तरुणीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहेत.
घरकाम करणाऱ्या शेखची स्थानिक परिसरात राहणाºया मुलाशी मैत्री होती. तिच्या हत्येनंतर तो मुलगा पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दिली. शेखवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय तपास अधिकाºयांना आहे. मात्र, तिचा अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाणार असल्याचे गणमे यांनी सांगितले. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखादेखील मुख्य मारेकºयाचा शोध घेत आहे.

Web Title: Four investigations into the murder of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.