शाळेच्या निधी संकलनासाठी माजी विद्यार्थीच बनणार सदिच्छादूत, डी एस हायस्कूलचा अभिनव उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:55 PM2018-10-29T15:55:33+5:302018-10-29T15:56:41+5:30

शाळेचे माजी विद्यार्थी हेच शाळेचे खरेखुरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असतात, हे ओळखून त्यांनाच शाळेचे सदिच्छा दूत बनवण्यासाठी तसंच त्यांच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांसाठी निधी उभा करण्यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे.

Former student will be Good will Ambesidar for the funding of the school | शाळेच्या निधी संकलनासाठी माजी विद्यार्थीच बनणार सदिच्छादूत, डी एस हायस्कूलचा अभिनव उपक्रम 

शाळेच्या निधी संकलनासाठी माजी विद्यार्थीच बनणार सदिच्छादूत, डी एस हायस्कूलचा अभिनव उपक्रम 

Next

 मुंबई  - शाळेचे माजी विद्यार्थी हेच शाळेचे खरेखुरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असतात, हे ओळखून त्यांनाच शाळेचे सदिच्छा दूत बनवण्यासाठी तसंच त्यांच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांसाठी निधी उभा करण्यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे. याअंतर्गत शाळेच्या निवडक माजी विद्यार्थ्यांना आॅर्गनायजेशन डेव्हलपमेंटचे अर्थात संस्थात्मक विकासाचे प्रशिक्षण दिले जात असून त्यासाठी आॅर्गनायजेशन डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत शाळेने घेतली आहे.

सरकारकडून शाळांना मिळणारे अनुदान दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना अवांतर उपक्रम राबवण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. यापुढे केवळ सरकारी अनुदानांवर अवलंबून राहून शाळा चालवणे व टिकवणे हे केवळ अशक्य होणार असून संस्था चालकांनी पुढाकार घेऊन निधी उभारणीसाठी नवनवीन मार्ग शोधून काढणे गरजेचे आहे असं मत डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. शाळेतून शिकून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात मुलं करीअर करतात. पण शाळेबद्दल त्यांच्या मनात एक हळवा कोपरा असतोच. शाळेबद्दल चार चांगल्या गोष्टी माजी विद्यार्थीच सांगू शकतात, हे ओळखूनच शाळेच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली आहे. “या माजी विद्यार्थ्यांना आॅर्गनायजेशन डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले हरेंद्र देशपांडे नियमितपणे प्रशिक्षण वर्गांद्वारे माजी विद्यार्थ्यांमध्ये ध्येय निश्चिती, संघ भावना, संवाद कौशल्ये तसंच काॅर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलिटी अंतर्गत निधी संकलनासाठी प्रयत्न कसे करावेत, या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन करत आहेत”, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.  

गेल्या तीन चार महिन्यांमधे आम्ही लहानमोठे उपक्रम आखून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. येणा-या काळात आम्ही शाळेचे नाव सर्वदूर पसरेल आणि निधीचे संकलनही होईल, अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नरत आहोत असे शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सुशांत शिंदे यांनी सांगितले.

या शाळेचे व्यवस्थापन तसंच नियमन करणा-या समित्यांमधील प्रत्येकजण हा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह प्रत्येक विश्वस्त तसंच पदाधिकारी हा शाळेचाच माजी विद्यार्थी असून शाळेचे कामकाज चालवण्यासाठी आमच्यापैकी एकही व्यक्ती एकही रुपया मानधन म्हणून घेत नाही

- राजेंद्र प्रधान , अध्यक्ष, डी एस हायस्कूल 

Web Title: Former student will be Good will Ambesidar for the funding of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.