डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:35 AM2018-10-05T03:35:34+5:302018-10-05T03:35:54+5:30

सप्टेंबरमधील अहवाल : स्वाइनचा या वर्षीचा रुग्ण आढळला

Five people from Dengue, one victim of leptto | डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी

डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी

googlenewsNext

मुंबई : शहर-उपनगरातून पाऊस जाऊन आता आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकरांचा ताप वाढला असून साथीचे आजार बळावत आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये शहर-उपनगरात डेंग्यूचे पाच बळी गेले असून लेप्टोचा एक बळी गेला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेप्टो आणि डेंग्यूमुळे तब्बल १२ बळी गेले होते. तसेच मुंबईत या वर्षीचा पहिला स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याची नोंदही अहवालात आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

सप्टेंबर महिन्यात ४ हजार ३६५ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांत, दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूत कांदिवली पूर्व आकुर्ली मार्ग येथील १३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या मुलाला सलग ४ ते ५ दिवस ताप, उलट्यांचा त्रास होत होता. त्यानंतर त्याला २६ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तिथून पालिका रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. २८ तारखेला त्याचा मृत्यू झाला. तसेच एक आठवडा लंडनला प्रवास करून आलेल्या ४२ वर्षीय वाळकेश्वर येथील महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद आहे. २० सप्टेंबर रोजी महिलेला ताप, अंगदुखी, मळमळ या कारणांमुळे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. २८ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. पालिकेद्वारे घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २ हजार ६७ घरांतील ६ लाख ५० हजार ११७ लोकसंख्येची तपासणी करण्यात आली आहे. मोहिमेत डासांची तब्बल ४ हजार ७९३ उत्पत्तीस्थळे आढळली असून त्यांवर कीटकनाशक फवारणी केली आहे. तसेच २२ हजार ४७३ डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत.

सप्टेंबर २०१७ सप्टेंबर २०१८
आजार रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
मलेरिया ८४९ ० ६२५ ०
लेप्टो ५९ ३ २७ १
डेंग्यू ४१२ १२ ३९८ ५
स्वाइन फ्लू ३३ ० १ ०
गॅस्ट्रो ५३२ ० ४४५ ०
हेपेटायटिस १०५ ० १११ ०
कॉलरा २ ० १ ०
 

Web Title: Five people from Dengue, one victim of leptto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.