लवकरच पाच नवीन ‘मोनो’; दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीए सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:59 AM2019-01-03T03:59:47+5:302019-01-03T04:00:13+5:30

चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा २ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा प्रकल्प वेळेत सुरू होण्यासाठी एमएमआरडीएला एकूण १० गाड्यांची गरज आहे.

 Five new 'mono' soon; For the second phase, MMRDA has come out | लवकरच पाच नवीन ‘मोनो’; दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीए सरसावली

लवकरच पाच नवीन ‘मोनो’; दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीए सरसावली

Next

- अजय परचुरे

मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा २ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा प्रकल्प वेळेत सुरू होण्यासाठी एमएमआरडीएला एकूण १० गाड्यांची गरज आहे. त्यापैकी ५ नवीन गाड्या येत्या आठवड्याभरात एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होतील. यानंतर या नवीन गाड्यांची चाचणी केली जाणार आहे.
मोनो रेल्वेचा बहुप्रतीक्षित दुसरा टप्पा सुरू करण्यास १० नव्या गाड्यांची गरज आहे. त्यानुसार नव्या पाच गाड्या मागविण्यात आल्या असून त्या शक्य तितक्या लवकर मुंबईत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यानुसार या गाड्या १० जानेवारीपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यावरील १० पैकी पाच गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या आहेत. त्यातील एका निविदेची निवड करून लवकरच गाड्या दुरुस्त केल्या जातील.
या गाड्या दुरुस्त झाल्याबरोबर मोनोचा दुसरा टप्पा सुरू केला जाईल. त्यातही नव्या गाड्या आल्यास दुसºया टप्प्यातील मार्गावर गाड्यांच्या फेºयाही वाढविण्यात येतील, असे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितले.
मोनोच्या दुसºया टप्प्याच्या बांधकामाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या मार्गाच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. आता यासाठी लागणाºया गाड्या दाखल झाल्यावर हा प्रकल्प सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही. त्यानुसार नवीन गाड्या वेळेत दाखल होत आहेत. तर नादुरुस्त गाड्यांचे काम २२ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याने दुसरा टप्पा दिलेल्या वेळेत पूर्ण होण्यासाठी सध्या तरी कोणतीही अडचण आमच्यापुढे नाही, असे राजीव यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे म्हणजे चेंबूर ते जेकब सर्कल या संपूर्ण मोनोमार्गाचा ताबा एमएमआरडीएने स्वत:कडे घेतला आहे. मोनोच्या व्यवस्थापनासह देखभालीची जबाबदारीही आता एमएमआरडीएकडे आहे.

दुसºया टप्प्यानंतर प्रवासी संख्या वाढणार!
मुळात वडाळा ते जेकब सर्कलदरम्यानच्या दुसºया टप्प्याला सर्वांत जास्त मागणी आहे. मोनोचा दुसरा टप्पा हा मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे या भागात चाकरमान्यांची दररोजची ये-जा असते.
दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून तोट्यात जाणाºया मोनोला आर्थिक स्थैर्य मिळेल. त्यामुळे एमएमआरडीए या टप्प्यातील लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.

२ फेब्रुवारीला ठरवून दिलेल्या दिवशीच मोनोचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- आर.ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए

Web Title:  Five new 'mono' soon; For the second phase, MMRDA has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.