उरकून घ्या, लवकर बँकिंग व्यवहार; बँका सलग पाच दिवस राहणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:08 PM2018-10-27T15:08:50+5:302018-10-27T16:08:43+5:30

बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकरच उरकून घ्या कारण दिवाळीत बँकांना पाच दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

five days bank closing during diwali festival | उरकून घ्या, लवकर बँकिंग व्यवहार; बँका सलग पाच दिवस राहणार बंद!

उरकून घ्या, लवकर बँकिंग व्यवहार; बँका सलग पाच दिवस राहणार बंद!

Next

मुंबई - बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकरच उरकून घ्या कारण दिवाळीतबँकांना पाच दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान बँका बंद राहणार आहेत. बुधवारी 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा, शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी भाऊबीज असल्याने बँका बंद असणार आहेत. तसेच 10 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 11 नोव्हेंबरला रविवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. 

दिवाळीत बँका सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. बँकांचे व्यवहार बंद असल्याने पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. रोखीच्या पैशासाठी नागरिक मोठ्या प्रमाणातून एटीएममधून पैसे काढण्यावर भर देण्याची शक्यता असल्याने एटीएममध्येही रोख पैशाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मात्र दरम्यानच्या काळात नागरिकांनीही कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यास एटीएमवरचा ताण कमी होईल आणि रोख पैशाची चणचण भासणार नाही.

Web Title: five days bank closing during diwali festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.