पुलाच्या सर्वेक्षणासाठी याल तर हुसकावून लावू, मच्छीमारांचा वर्सोवा-विरार सी लिंकला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:16 PM2023-12-01T12:16:18+5:302023-12-01T12:16:36+5:30

Mumbai: वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू,  असा निर्धार स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. 

Fishermen protest Versova-Virar sea link if they come for bridge survey | पुलाच्या सर्वेक्षणासाठी याल तर हुसकावून लावू, मच्छीमारांचा वर्सोवा-विरार सी लिंकला विरोध

पुलाच्या सर्वेक्षणासाठी याल तर हुसकावून लावू, मच्छीमारांचा वर्सोवा-विरार सी लिंकला विरोध

मुंबई - वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू,  असा निर्धार स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. 

एमएमआरडीएकडून वर्सोवा ते विरार हा ४२.७५ किमी लांबीचा सागरी पूल उभारला जाणार आहे. मात्र या पुलाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचा व्यवसाय गोत्यात येणार असल्याने स्थानिक मच्छीमारांनी या बांधकामाला विरोध केला आहे. 

या प्रकल्पासाठी समुद्रात करण्यात येणाऱ्या बांधकामामुळे मच्छीमारी व्यवसायाला फटका बसणार आहे. समुद्रात बोटी घेऊन जाताना  व बाहेर आणताना त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे लवकरच या संदर्भात सर्व मच्छीमारांची बैठक घेण्यात येणार असून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.
- संतोष कोळी, अध्यक्ष, मढ दर्यादीप मच्छीमार सहकारी सोसायटी 

मच्छीमारांची मनधरणी
प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू असून पुन्हा एकदा मच्छीमारांची मनधरणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वेक्षण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, तसेच या पुलाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. 

Web Title: Fishermen protest Versova-Virar sea link if they come for bridge survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई