राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:09 IST2017-09-28T01:08:52+5:302017-09-28T01:09:04+5:30

राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर (९२) यांच्यावर बुधवारी अंधेरीतील पारशीवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

The first Director General of the State P. The funeral of the government on Medhekar | राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर (९२) यांच्यावर बुधवारी अंधेरीतील पारशीवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्सोवा येथील रहिवासी असलेले मेढेकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अंजली, चिरंजीव राजन व अजित, कन्या वैजयंती गुप्ते, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत वर्सोवा येथील पोलीस आॅफिसर प्रोग्रेसिव्ह को-आॅप. सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.
या वेळी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर पारशीवाडी स्मशानभूमीत मेढेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The first Director General of the State P. The funeral of the government on Medhekar

टॅग्स :Mumbaiमुंबई