VIDEO - मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 04:05 PM2017-10-26T16:05:34+5:302017-10-26T17:03:49+5:30

मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीने रौद्ररुप धारण केले आहे.

The fire at the slum near the Vandra Railway Station in Mumbai, five fire engines of the fire brigade | VIDEO - मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी

VIDEO - मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी

Next

मुंबई - मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली. 

अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लांबून धुराचे लोट आकाशात जातान दिसत आहेत. बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर असून अनेक झोपडया वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून आहेत. 

अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल 4 ची आग म्हणून घोषित केले आहे. अग्निशमन दलाच्या बारा गाडयांसह तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सध्या तरी या आगीमध्ये कोणतिही जिवीतहानी झालेली नाही. वांद्रयातील भाभा आणि व्ही.एन.देसाईल हॉस्पिटलला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

कसा आहे परिसर 
बेहरामपाडा झोपडपट्टीचा परिसर असून इथे झोपडपट्टया दाटीवाटीने वसलेल्या आहेत. त्यामुळे ही आग वेगाने पसरण्याची भिती आहे. आग लागलेल्या झोपडयांमधील सिलिंडरचे स्फोट होत असल्याने आग अधिक भडकत आहे.  अरुंद गल्ल्या आणि जमलेली गर्दी यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना अनेक अडथळयांचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनला लागून झोपडया असल्याने रेल्वे स्थानक परिसरापर्यंत आग पसरण्याचा धोका आहे. या रेल्वे स्टेशनवरचा स्कायवॉकही बंद करण्यात आला असून, रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. या परिसरात अनेक मोठया कंपन्यांची कॉर्पोरेट ऑफीसेसे आहेत. आता ऑफीस सुटण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील गर्दी आणखी वाढणार आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासह लवकरात लवकर आग विझवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

Web Title: The fire at the slum near the Vandra Railway Station in Mumbai, five fire engines of the fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग