मुंबई सेंट्रल येथे जिया इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:51 PM2018-01-05T13:51:01+5:302018-01-05T21:02:34+5:30

मुंबई सेंट्रलमध्ये जिया इमारतीला आग लागल्याचं वृत्त आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire at the Jia building in Mumbai Central and the fire brigade was in the spot | मुंबई सेंट्रल येथे जिया इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी 

मुंबई सेंट्रल येथे जिया इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी 

Next

मुंबई : मुंबई सेंट्रलमध्ये जिया इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. इमारतीत अडकलेल्या एका व्यक्तीला आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.  

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या सहा मजली इमारतीला आग लागली. आगीचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या बेसमेंटला ही आग लागली. बेसमेंटला असलेल्या तीन दुकानांना ही आग लागल्याचं समजतं.

 

 

Web Title: Fire at the Jia building in Mumbai Central and the fire brigade was in the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.