वजनवाढीच्या पावडरवर एफडीएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:09 AM2019-07-17T01:09:17+5:302019-07-17T01:09:25+5:30

व्यायाम शाळेत खूप व्यायाम करूनही काहींचे वजनवाढ होत नाही. जलदगतीने वजन वाढीसाठी तरुणाईकडून सर्रासपणे पावडरचे (सप्लिमेंट) सेवन केले जाते,

FDA action on weight loss powders | वजनवाढीच्या पावडरवर एफडीएची कारवाई

वजनवाढीच्या पावडरवर एफडीएची कारवाई

Next

मुंबई : व्यायाम शाळेत खूप व्यायाम करूनही काहींचे वजनवाढ होत नाही. जलदगतीने वजन वाढीसाठी तरुणाईकडून सर्रासपणे पावडरचे (सप्लिमेंट) सेवन केले जाते, परंतु पावडर विकणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट व न्युट्रॉसिटीकल विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होते. दुकानात मिळणाºया पावडरमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अन्न व औषध प्रशासनाकडून नुकतीच अंधेरी व वांद्रे परिसरातील चार हेल्थ सप्लिमेंट व न्युट्रॉसिटीकल विक्रेत्या दुकानावर कारवाई करून, ‘न्युट्रॉसिटीकल डायट्री सप्लिमेंट’ ही पावडर जप्त करण्यात आली आहे. येथे दोन दुकाने विनापरवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.
दुकानामध्ये विक्रीस उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान उत्पादनामध्ये लेबलदोष आढळून आला. उत्पादन औषध म्हणून नमूद नाही. उत्पादक/आयातदाराचे नाव व पत्ता दिलेले नाही. अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत परवाना क्रमांक नाही. घटकात कृत्रिम स्वाद व रंग वापरल्याबाबत नमूद नाही. हेल्थ सप्लिमेंट हे दैनंदिन आहाराला पर्याय म्हणून वापरता येणार नाही. शाकाहारी अथवा मांसाहारी अन्नपदार्थाबाबतचे चिन्ह नाही. उत्पादन ज्या देशात झाले, त्या देशाचे नाव नमूद नाही, अश प्रकारचे दोष लेबलमध्ये तपासणीत आढळले. अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले असून, उर्वरित साठ्यात भेसळीची दाट शक्यता व लेबलदोष असल्यामुळे अन्न नमुने मुंबईतील अन्न व औषध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी या संदर्भात सांगितले की, तरुणाईमध्ये झटपट वजन वाढविण्याचे फॅड अधिक वाढत आहे. नागरिकांनी जागृत राहून आपण जे पदार्थ खातोय, ते खरच चांगल्या दर्जाचे आहेत का? याची पडताळणी केली पाहिजे. वजनवाढीसाठी कोणतेही अन्नपदार्थ घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त वाढले, तर ते किडनीसाठी अपायकारक ठरते. पूर्वी ही पावडर औषध म्हणून उपलब्ध होती, परंतु औषधाचा कायदा कडक असल्यामुळे त्याचे रूपांतर अन्नामध्ये करण्यात आले. या संदर्भातील तपासण्या राज्यभरात राबविल्या जातील. अन्नपदार्थांचे पुरवठादार व आयातदार यांना कायद्यांतर्गत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार दोन विनापरवाना व्यवसाय करणाºया दुकानांचे कामकाज थांबविण्यात आले आहे.

Web Title: FDA action on weight loss powders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.