फॅन्सी नंबरप्लेट लावणे ६,१९४ चालकांना भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:18 AM2019-07-15T06:18:34+5:302019-07-15T06:18:41+5:30

वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार याबाबत सेंट्रल मोटार व्हेइकल कायद्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत.

Fancy number plates 6, 9 4 driving the drivers | फॅन्सी नंबरप्लेट लावणे ६,१९४ चालकांना भोवले

फॅन्सी नंबरप्लेट लावणे ६,१९४ चालकांना भोवले

Next

मुंबई : वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार याबाबत सेंट्रल मोटार व्हेइकल कायद्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. पण, अनेक वेळा वाहनचालक या नियमांचे उल्लंघन करत फॅन्सी नंबर प्लेट किंवा इतर नावाच्या पाट्या लावतात. मोटार वाहन विभागाने वर्षभरात अशा ६१९४ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ४२ लाख १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या काही वाहनचालकांकडून फॅन्सी नंबर प्लेटला पसंती दिली जात आहे. यात वाहनांवर कॅलिग्राफी केलेली इंग्रजी अक्षरे किंवा वाचताही येणार नाहीत इतका लहान क्रमांक लिहिला जातो. काही ठिकाणी वाहन क्रमांकाची मांडणी ही इंग्रजी किंवा मराठी शब्दाप्रमाणे केली जाते. पण नियमांप्रमाणे नंबर प्लेट असावी, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते.
मोटार वाहन विभागाने एप्रिल ते मे दरम्यान २११५ वाहनांची तपासणी केली. यामध्ये ४४४ वाहने दोषी आढळली. या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३,१२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
>नंबर प्लेटबाबत अशी आहे नियमावली
नंबर लिहिताना इंग्रजी लिपीचाच वापर करावा. पांढऱ्या पाटीवर काळी अक्षरे असावीत.
नंबर प्लेटवर या क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो आदी.) चालत नाही.
लिहिण्यात आलेले क्रमांक स्पष्ट व सरळच असावे. सर्व दुचाकी आणि तीन चाकी वाहनांवरील पाठीमागच्या नंबर प्लेटवरील अक्षरांची उंची ३५ सेमी असावी आणि रुंदी ७ सेमी असावी त्यामधील अंतर ५ सेमी असावे.
सर्व दुचाकी आणि तीन चाकी वाहनांवरील आकड्यांची उंची ४० सेमी असावी, रुंदी ७ सेमी आणि यामधील अंतर ५ सेमी असावे.

Web Title: Fancy number plates 6, 9 4 driving the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.