बीडीडी पुनर्विकासात अडथळा आणल्यास बाहेरचा रस्ता; म्हाडाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:49 AM2019-01-30T00:49:14+5:302019-01-30T00:49:41+5:30

विरोध करणाऱ्या रहिवाशांमध्ये नाराजी

External road if BDD is interrupted by redevelopment; MHADA decision | बीडीडी पुनर्विकासात अडथळा आणल्यास बाहेरचा रस्ता; म्हाडाचा निर्णय

बीडीडी पुनर्विकासात अडथळा आणल्यास बाहेरचा रस्ता; म्हाडाचा निर्णय

Next

मुंबई : मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाºया बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प सध्या म्हाडाकडून राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या पुनर्विकासाला बीडीडी चाळीतील काही रहिवाशांकडून जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे म्हाडाला पुनर्विकासात अडथळे येत आहेत. ते दूर करण्यासाठी आता विरोध करणाºया रहिवाशांवर कारवाई करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे बीडीडी चाळीतील विरोध करणाºया रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

मुंबईत डिलाईल रोड, वरळी, नायगाव, शिवडी येथे ९२ एकर जागेवर २०७ बीडीडी चाळी आहेत. यापैकी वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील १९५ चाळींचा पुनर्विकास होत आहे. शिवडी येथील चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. यातील बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग, वरळी, नायगाव या तिन्ही वसाहतींच्या पुनर्विकासास काही रहिवाशांकडून विरोध होत आहे. हक्काच्या घरातून म्हाडा देत असलेल्या संक्रमण शिबिराच्या घरात जाण्यास ते तयार नाहीत. शिबिरातील घरे नादुरुस्त व लहान असल्याने त्यांनी अद्याप चाळीतील घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे पुनर्विकासास अडथळे येत आहेत.

म्हाडाच्या अधिनियम १९७६ मधील कलम ९५ अ नुसार अशा विरोध करणाºया भाडेकरूंना घराबाहेर काढण्यात म्हाडाला अडचणी येत होत्या. त्यासाठी या अधिनियमात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विरोध करणाºया रहिवाशांना म्हाडा आता बाहेरचा रस्ता दाखविणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.

चव्हाण यांनी पुनर्विकासात येणाºया अडथळ्यांबाबत अतिरिक्त मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, म्हाडाचे उपाध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविले होते. त्याचा विचार करून बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता लवकरच विरोध करणाºया रहिवाशांना घराबाहेर काढण्याच्या कारवाईला म्हाडाकडून सुरुवात होईल. मात्र, यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे. याविरोधात आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अधिनियमात केला बदल
म्हाडाच्या अधिनियम १९७६ मधील कलम ९५ अ नुसार विरोध करणाºया भाडेकरूंना घराबाहेर काढण्यात म्हाडाला अडचणी येत होत्या. त्यामुळे या अधिनियमात आवश्यक ते बदल करून पुनर्विकासात अडथळा आणणाºया रहिवाशांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा ठराव म्हाडा प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.

Web Title: External road if BDD is interrupted by redevelopment; MHADA decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा