दहावीच्या विद्यार्थ्यांचे कलागुण सादर करण्यासाठी शाळांना मिळाली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:55 AM2019-01-20T04:55:37+5:302019-01-20T04:55:44+5:30

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या, तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुण मंडळाकडे सादर करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

Extension of schools to the students of class X students | दहावीच्या विद्यार्थ्यांचे कलागुण सादर करण्यासाठी शाळांना मिळाली मुदतवाढ

दहावीच्या विद्यार्थ्यांचे कलागुण सादर करण्यासाठी शाळांना मिळाली मुदतवाढ

Next

मुंबई : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या, तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुण मंडळाकडे सादर करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, आता शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला ग्रेड परीक्षेचे गुण मंडळाकडे २५ जानेवारी, २०१९ पर्यंत सादर करायचे आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांना कला विषयातील वाढीव गुण यंदा मिळणार आहेत. त्या संदर्भातील प्रस्ताव शाळांनी याआधी मंडळांकडे २० जानेवारी, २०१९ पर्यंत पाठविणे गरजेचे होते. मात्र, नुकताच सप्टेंबर, २०१८च्या कला विषयाच्या परीक्षेचा निकाल लागला असून, तो केंद्र, त्यानंतर शाळा असा येणार असल्याने, त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत राज्य मंडळाने या गुणांसंदर्भातील मुदत न वाढविल्यास, ते विद्यार्थी या गुणांना मुकणार असल्याची भीती मुख्याध्यापक संघटनेने व्यक्त केली होती. राज्य मंडळाने यंदा, तसेच भविष्यात ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्याची मागणीही त्यांनी केली होती. विद्यार्थीहित लक्षात घेता, मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंडळाने केल्या आहेत. कलागुणांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची खबरदारी शाळांनी घेण्याचे निर्देश राज्य शिक्षण मंडळाने दिले.
>‘हॉलतिकीट आॅनलाइन वितरित करा’
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट यंदापासून आॅनलाइन देण्यात येणार आहे. त्यानुसार, शाळा आणि महाविद्यालयांना हॉलतिकीट आॅनलाइन वितरित करण्याचे निर्देशही मंडळाने यंदा दिले आहेत.

Web Title: Extension of schools to the students of class X students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.