कोकणातील विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:45 AM2019-05-13T04:45:28+5:302019-05-13T04:45:43+5:30

कोकणात प्रवास करण्यासाठी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मांडवी या मेल, एक्स्प्रेस प्रसिद्ध आहेत.

 Express special mail from Konkan, passenger passengers ignored | कोकणातील विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

कोकणातील विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

Next

मुंबई : कोकणवासीयांना गर्दीमुक्त प्रवास करण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. मात्र, या मेल, एक्स्प्रेसला जादा थांबा व इच्छितस्थळी पोहोचण्यास जास्त कालावधी लागत असल्याने, विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांनी दुर्लक्ष केले असून, नियमित गाड्यांना पसंती दर्शविली आहे.
कोकणात प्रवास करण्यासाठी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मांडवी या मेल, एक्स्प्रेस प्रसिद्ध आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत प्रवासी संख्या जास्त असल्याने या गाड्यांवर गर्दीचा भार जास्त होतो. हा भार विभाजित करण्यासाठी मध्य व कोकण रेल्वे प्रशासन उन्हाळ्याच्या काळात प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालविण्यात येतात. कोकण रेल्वेच्या एकूण १९६ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. मात्र, प्रवाशांनी विशेष मेल, एक्स्प्रेसऐवजी नियमित मेल, एक्स्प्रेसमधून जाणे पसंत करत आहेत. तुतारी, कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी २०० ते २५० आहे. यासह काही मेल, एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नाही, तर दुसरीकडे विशेष गाड्यांसाठीची आरक्षित तिकिटे उपलब्ध असून, प्रवासी या गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रतिसाद देत नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title:  Express special mail from Konkan, passenger passengers ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे