प्रयोगशील शिक्षक हेच आजच्या काळातले खरे गुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:23 AM2019-07-16T01:23:15+5:302019-07-16T01:23:28+5:30

‘गुरू’ या शब्दातच खूप मोठा अर्थ लपला आहे, पण आताच्या या नवनवीन तंत्रज्ञानामुळे आत्ताची पिढी गुरू या संकल्पनेला मुकत चालले आहेत.

The experiential teacher is the true master of today | प्रयोगशील शिक्षक हेच आजच्या काळातले खरे गुरू

प्रयोगशील शिक्षक हेच आजच्या काळातले खरे गुरू

googlenewsNext

मुंबई : ‘गुरू’ या शब्दातच खूप मोठा अर्थ लपला आहे, पण आताच्या या नवनवीन तंत्रज्ञानामुळे आत्ताची पिढी गुरू या संकल्पनेला मुकत चालले आहेत. वेगवेगळी अ‍ॅप, वेबसाइट्स हेच त्यांचे गुरू बनले आहेत. आताची तरुण पिढी नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि पुस्तके नावाच्या गुरू या संकल्पनेला मुकत चालली आहेत, पण तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरीही ते आई वडील आणि शिक्षक असलेल्या गुरूची जागा घेऊच शकत नाही. अशाच काही प्रयोगशील शिक्षकांमुळे शिक्षणाचे रूपडे आज पालटले असून, विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खरा अर्थ समजावून देत आहेत, हे विसरायला नको.
तंत्रज्ञानाचे बाळकडू देणारा शिक्षक ‘गुरू’
सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली ‘क्यूआर कोड’ पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांत २०१५ पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसत आहेत. हा महाराष्ट्रातील एका शिक्षकाचा मोठा बहुमान असून, ‘टेक्नॉलॉजी’ हा गुरू कसा होऊ शकतो, हे दुसऱ्या गुरूने शिकविण्याचे उत्तम उदाहरण आहे. डिसले सरांची संशोधक बुद्धी फक्त शिक्षणापुरती मर्यादित राहिली नाही, शिवाय स्काइपच्या माध्यमातून ते आपल्या शाळेतील मुलांचा संवाद इतर देशांच्या शाळांतील मुलांशी साधण्यास मदत करत आहेत. त्यांनी भारत, पाकिस्तान, इराण, इराक यांसारख्या आठ देशांमध्ये प्रत्येकी पाच हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार केली आहे. ही संख्या पन्नास हजारांपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.
बालरक्षक चळवळीची शाळाबाह्य गुरू
स्वत: शाळाबाह्य ठरलेल्या शिक्षिका पुष्पलता मुळे या मुंबईतील बालरक्षक चळवळीच्या खºया प्रणेत्या ठरल्या आहेत. त्यांना राज्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला असूनही, आजही त्या शाळाबाह्य मुलांना शिकविण्यासोबत शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाची संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. घाटकोपर पूर्वेला असणाºया शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेत त्या मागील वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका खेड्यात शिक्षण घेतलेल्या मुळे यांचे दहावी नापास झाल्यावर लग्न झाले. मुलगा झाला आणि दहा वर्षांच्या खंडानंतर त्यांचे पती अशोक मुळे यांच्या प्रेरणेने पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली.
विशेष मुलांचा गुरू
साध्या व नियमित विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवितातच, पण विशेष मुलांना शिकविणे हे मोठे दिव्य असते. मात्र, मालाडच्या जिजामाता विद्यालयातील ऋषिराज दुखंडे गेली अनेक वर्षे हे अशा मुलांना शिकविण्याचे काम करत आहेत.
या मुलांच्या अध्ययन शैलीचा
अभ्यास करून त्यांच्यासाठी
विशेष प्रयत्न त्यांना करावे
लागतात. अशा मुलांत भाषा,
भाव, शक्ती निर्माण करण्यासाठी दृकश्राव्य साधने, चित्र, रंगीत
कार्ड्स, आकडे, आरसे, छायाचित्र, नकाशे, प्रतिकृती, अंतरोपरिदर्श, चित्रपट, दूरदर्शन संच इत्यादी साधने वापरली जातात. त्यामुळे असा शिक्षक म्हणजे स्वत:मध्येच एक विशेष गुरू असतो.
>वस्त्यांमध्ये शाळा उभारणारी गुरू : स्त्री शिक्षणाचा पाया रचणाºया सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक महिला शिकल्या. त्यांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेत आजघडीला अनेक शिक्षिका समाजातील तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला शिक्षिका करत आहे. यापैकीच एक म्हणजे रोहिणी लोखंडे आहेत. बदली झालेल्या प्रत्येक ठिकाणी लोकसहभागातून शाळेची बांधणी, जि. प. शाळांची पटसंख्या वाढविण्याचे काम रोहिणी लोखंडे करत आहेत. दप्तरमुक्त शनिवार, पोषण आहार, शाळेतील वृक्ष लागवड, अपघातग्रस्तांना शाळेकडून निधी असे अनेक उपक्रम त्या राबवित आहेत. शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, बोलक्या भिंती, ग्लोबल क्लासरूम, वाय-फाय या सुविधा उभारण्यासही त्यांचा हातभार लागत आहे.

Web Title: The experiential teacher is the true master of today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.