Elgar Morcha : एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सामील होणार नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 08:50 AM2018-03-26T08:50:18+5:302018-03-26T08:50:18+5:30

भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पुकारलेल्या एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सहभाही होणार नाही, असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. 

Elgar Morcha: Will not join the Republican party in the Elgar Morcha - Ramdas Athavale | Elgar Morcha : एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सामील होणार नाही - रामदास आठवले

Elgar Morcha : एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सामील होणार नाही - रामदास आठवले

googlenewsNext

मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पुकारलेल्या एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सहभाही होणार नाही, असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. 
रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या एल्गार मोर्चाला शुभेच्छा आहेत, मात्र आमचा पाठिंबा नाही आहे. तसेच, मी मंत्री झाल्यामुळे त्यांना आवडत नसेल तरी सुद्धा आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्याचबरोबर आम्ही समाज म्हणून एकच असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. 
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी, आज जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे रविवारी पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. परवानगी नाकारायचीच होती, तर ती आधीच नाकारायची होती. आता मोर्चासाठी राज्यातून लोक निघाले आहेत. त्यांना परत पाठविता येणार नाही. जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात करायचे आमचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारून ते विस्कटवले. आता आम्ही थेट सीएसएमटीला जमणार आणि तिथेच काय तो निर्णय घेणार. आता नियंत्रण करणे आमच्या हातात नाही. सोमवारी जे काही होईल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने अजूनही आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संभाजी ब्रिगेडचा मोर्चाला पाठिंबा
संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Elgar Morcha: Will not join the Republican party in the Elgar Morcha - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.