द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:02 PM2024-01-02T14:02:19+5:302024-01-02T14:02:47+5:30

गिरगावात ६ जानेवारी रोजी त्यांच्या प्रचाराची पहिली सभा आ. आदित्य ठाकरे घेणार आहेत.

Election preparation of Thackeray group from south Mumbai, Aditya Thackeray's meeting in Girgaon on January 6 | द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा

द. मुंबईतून ठाकरे गटाची निवडणूक तयारी, ६ जानेवारीला गिरगावात आदित्य ठाकरेंची सभा

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले नसले तरी ठाकरे गटाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करण्याचे ठरवले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे.  गिरगावात ६ जानेवारी रोजी त्यांच्या प्रचाराची पहिली सभा आ. आदित्य ठाकरे घेणार आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात खासदार अरविंद सावंत निवडून आले आहेत. दोन्ही लोकसभा निवडणुकींत भाजप-शिवसेना युती होती. त्याचा फायदा अरविंद सावंत यांना झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी भाजपकडून उमेदवार दिला जाणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आहे. 
 

Web Title: Election preparation of Thackeray group from south Mumbai, Aditya Thackeray's meeting in Girgaon on January 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.