अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयाला ईडीचे समन्स, मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा; पदाचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:06 AM2024-03-27T11:06:35+5:302024-03-27T11:07:17+5:30

३६ टक्के अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप

ED summons to Anil Desai's kin, money laundering offence; Abuse of office | अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयाला ईडीचे समन्स, मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा; पदाचा गैरवापर

अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयाला ईडीचे समन्स, मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा; पदाचा गैरवापर

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने फेब्रुवारी महिन्यात मनी लाॅंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता या आठवड्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यात बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयनेदेखील भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता. सीबीआने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 

२०१३ ते २०२३ या कालावधीमध्ये दिनेश बोभाटे हे एका विमा वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत होते. त्या कालावधीमध्ये विमा विषयात काम करताना त्यांनी पदाचा गैरवापर करत ज्ञात उत्पन्नापेक्षा ३६ टक्के अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी २ कोटी ६० लाखांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणी त्यांच्यासह पत्नीविरोधातदेखील सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या पैशांच्या व्यवहारामध्ये मनी लॉड्रिंगदेखील झाल्याचा संशय आल्यानंतर चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: ED summons to Anil Desai's kin, money laundering offence; Abuse of office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.