छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:21 AM2023-08-17T10:21:13+5:302023-08-17T10:22:33+5:30

५१३ जणांना अटक, १७६ राजकीय नेत्यांचा समावेश

ed seizes assets worth one lakh 15 thousand crore | छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील सर्वांत प्रभावी तपास यंत्रणा मानल्या जाणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या सहा वर्षांत तब्बल एक लाख १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या अनुषंगाने एकूण ५०९५ ईसीआयआर (प्राथमिक गुन्हे) नोंदवले आहेत, तर देशभरातून एकूण ५३१ लोकांना अटक केली आहे. राजकीय नेत्यांवरील कारवाईचा मागोवा घेतला असता एकूण १७६ राजकीय नेत्यांंविरोधात ईडीने गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये आमदार, माजी आमदार, आजी व माजी खासदार, आदींचा समावेश आहे.

ईडीची आकडेवारी  

- गुन्ह्यांची संख्या : हजारांवर
- प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली प्रकरणे: २५
- गुन्हे सिद्धता न झालेली प्रकरणे : २४
- मनी लाँड्रिंगचे सिद्ध झालेले गुन्हे : ४५

तात्पुरती जप्ती ते पक्की जप्ती

ईडीचे अधिकारी जेव्हा कारवाई करतात, त्यावेळी जर गुन्हा करून मिळवलेल्या पैशांतून मालमत्ता खरेदी किंवा माया गोळा केली असेल, तर त्याची जप्ती केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात ही जप्ती तात्पुरत्या प्रकारची असते. मात्र, त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याची पक्की जप्ती केली जाते. 

तात्पुरती जप्तीची कारवाई : १९१९ प्रकरणांत

- जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत : १,१५,३५० कोटी रुपये
- पक्क्या जप्तीची कारवाई : १६३२ प्रकरणांत
- जप्त केलेली रक्कम : ७१,२९० कोटी रुपये
- फेमा कायद्यांतर्गत तपासाधीन प्रकरणे : ३३,९८८ 
- फेमांतर्गत कारणे दाखवा नोटीस जारी : ८,४४०

फरार आर्थिक गुन्हेगार प्रकरणे

- मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 
- या कारवाईच्या माध्यमातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकूण ८६२ कोटी ४३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

 


 

Web Title: ed seizes assets worth one lakh 15 thousand crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.