कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 06:10 AM2019-07-14T06:10:46+5:302019-07-14T06:10:55+5:30

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वरळी सी-लिंक येथे कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बबलू कुमार रामपुनील पासवान या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Dying for the coastal road, the death of the child falls into a ditch | कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पडझडीच्या घटना घडत असतानाच शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वरळी सी-लिंक येथे कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बबलू कुमार रामपुनील पासवान या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
बबलू येथील मद्रासवाडी झोपडट्टीत राहत होता. ही झोपडपट्टी कोस्टल रोड प्रकल्पाला लागून आहे. हे ठिकाण सार्वजनिक शौचालयाच्या मागील बाजूस आहे. शुक्रवारी बबलू आणि त्याचे दोन मित्र लघुशंकेसाठी येथे गेले होते. तेथून परतत असताना बबलूचा पाय घसरला आणि तो पावसाच्या पाण्याने भरलेल्या या खड्ड्यात पडला. त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान, तेथे जमा झालेल्या स्थानिकांनी त्याला बाहेर काढले आणि नायर रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या काही ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, दिवाबत्तीची सोय असणे गरजेचे आहे. मात्र यापैकी कुठलीच सोय करण्यात आलेली नाही.
दरम्यान, शनिवारी सकाळी आणि दुपारी पावसाने शहराच्या तुलनेत उपनगरात दमदार हजेरी लावली. दुपारनंतर शहरातही पावसाचा जोर वाढला.
शहरात ३, पूर्व उपनगरात ६ अशा एकूण ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात ७, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात १, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ८ ठिकाणी झाडे पडली.
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास परळ येथील वाडिया रुग्णालयातील बाल कक्षात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
>बबलू आणि त्याचे दोन मित्र लघुशंकेसाठी येथे गेले होते. तेथून परतताना पाय घसरल्याने बबलू खड्ड्यात पडला व त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Dying for the coastal road, the death of the child falls into a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.