ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 08:05 PM2018-08-13T20:05:30+5:302018-08-13T20:54:20+5:30

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले.

dramatist jayawant nadkarni passes away | ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन

Next

मुंबई : ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. 

जयवंत नाडकर्णी हे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे शिष्य होते. नानासाहेंबासोबत त्यांनी हॅम्लेट या अजरामर नाटकात भूमिका केली होती. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.

जयवंत नाडकर्णी यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक सुवर्ण पदके प्राप्त झाली आहेत. तसेच त्यांना मुंबई महानगर पालिकेतून १९८४ या वर्षी निवृत्त होईपर्यंत खात्यांतर्गत, आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत  अभिनयाचे, दिग्दर्शनाचे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

Web Title: dramatist jayawant nadkarni passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.