वर्सोव्यात ' प्लास्टिक फ्री वर्सोवा ' योजना प्रभावीपणे राबवणार, आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:37 PM2018-05-01T19:37:08+5:302018-05-01T19:37:08+5:30

' ती फाऊंडेशन ' आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा. लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्सोव्याला प्लस्टिकच्या समस्येतून मुक्त करण्याच्या दृष्टीने एक योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.आजच्या महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार  व "ती फाऊंडेशन'च्या संस्थापक अध्यक्षा डॉ.भारती लव्हेकर यांनी या योजनेची वर्सोव्यात शुभारंभ केला.

Dr. Bharti Lavekar announces 'Plastic Free Versova' scheme in Versova | वर्सोव्यात ' प्लास्टिक फ्री वर्सोवा ' योजना प्रभावीपणे राबवणार, आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची घोषणा

वर्सोव्यात ' प्लास्टिक फ्री वर्सोवा ' योजना प्रभावीपणे राबवणार, आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची घोषणा

googlenewsNext

- मनोहत कुंभेजकर 

 मुंबई - ' ती फाऊंडेशन ' आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा. लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्सोव्याला प्लस्टिकच्या समस्येतून मुक्त करण्याच्या दृष्टीने एक योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.आजच्या महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार  व "ती फाऊंडेशन'च्या संस्थापक अध्यक्षा डॉ.भारती लव्हेकर यांनी या योजनेची वर्सोव्यात शुभारंभ केला.महाराष्ट्र सरकारने  'प्लॅस्टिक फ्री महाराष्ट्र' हे मिशन हाती घेतले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या स्तुत्य योजनेची अंमलबजावणी म्हणून आमदार डॉ. लव्हेकर यांनी वर्सोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे.त्यांच्या ' ती फाऊंडेशन ' आणि  ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्सच्या सयुक्त विद्यमाने ‘स्वच्छाग्रह ' कार्यक्रमांतर्गत वर्सोव्याला प्लास्टिकच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा शुभारंभ आज झाला.यावेळी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर,नगरसेविका रंजना पाटील,माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे आणि इतर मान्यवर व वर्सोव्यतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 याप्रसंगी बोलतांना  आमदार डॉ.लव्हेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्लास्टिक बंदीच्या अभिनव योजनेतून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज 'ती फाऊंडेशन'आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा.लिमीटेड संयुक्तरित्या ‘प्लॅस्टिक फ्री महाराष्ट्र’ सुरू करण्याच्या दृष्टीने हा पुढाकार घेतला आहे.आणि त्याची आज सुरुवात वर्सोव्यातून होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश प्लास्टिकचा कमीत-कमी वापर करणे आणि अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करणे हा आहे. 


या कार्यक्रमाअंतर्गत, ऍक्वाक्राफ्ट ग्रीन ऍक्वाटएम ही पाण्याची एटीएम मशीन्स विविध ठिकाणी बसवण्यात येतील, कार्यालये,महाविद्यालये, बाजारपेठ, मॉल, पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन, रुग्णालये इ. ठिकाणी बसवण्यात येतील.महिलांद्वारे चालवण्यात आलेली, महिलांच्या मालकीची असलेले महिला बचत गटांना, मुद्रा तसेच पीएमईजीपी योजने अंतर्गत आर्थिक कर्ज उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सशक्तीकरणाचे उद्दिष्ट साकारण्याच्या दृष्टीने उचलले हे एक पाऊल आहे.या महिला बचत गटांना मातीची भांडी आणि मातीची बाटल्यांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. जे  एक्वाटम्सच्या ठिकाणी अशा ग्रुप्स ना बसण्यासाठी जागा दिली जाईल. एक्वाटम्स म्हणजे जिथे पाणी आयआरसीटीसी ने पुनर्निर्धारित केलेल्या दराने विकले जाईल.300 मिलि साठी 1 / रू., 500 मि.ली. , रू. 3 / - 1 लिटर साठी रु. 5 / - आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी होत जाईल आणि या महिलांना रोजगारही उपलब्ध होईल असा विश्वास आमदार डॉ.लव्हेकर  यानी व्यक्त केला.

एक्काक्राफ्ट प्रा.लि चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय  प्रकल्प संचालक डॉ.सुब्रह्मण्य कुसनूर यांनी सांगितले की,या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सक्षम करून महिला सशक्तीकरण करताना निरंतर स्वच्छ पिण्यायोग्य पाणी पुरवणे, पाणी पुरवठा पर्यावरणाचा आदर करताना सर्वात स्वस्त दरात दरात पाणी उपलब्ध करून देते. ग्रीन ऍक्वाटएमची ठळक वैशिष्टये म्हणजे पाण्यातून अनावश्यक घटक दूर करून पाणी पिण्यायोग्य बनवणे,पाण्यातून कचरा अन्य घटक काढणे, आणि स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे हा आहे."प्लॅस्टिक फ्री  वर्सोवा ही एक चळवळ असून डॉ भारती लव्हेकर या राज्यातील पहिल्या आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत ज्या आमच्या ‘स्वच्छाग्रह’ या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत असे त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Dr. Bharti Lavekar announces 'Plastic Free Versova' scheme in Versova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.