'त्या' मुलीच्या आत्महत्येचा  व्हिडिओ व्हायरल करू नका; पालकांचं कळकळीचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 08:32 PM2018-06-29T20:32:15+5:302018-06-29T20:32:35+5:30

नववीत शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी देत आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे.

Do not viral the girl's suicide video; Appeal for Parents | 'त्या' मुलीच्या आत्महत्येचा  व्हिडिओ व्हायरल करू नका; पालकांचं कळकळीचं आवाहन 

'त्या' मुलीच्या आत्महत्येचा  व्हिडिओ व्हायरल करू नका; पालकांचं कळकळीचं आवाहन 

Next

मुंबई - नववीत शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी देत आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर व्हिलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. हि घटना काल गुरुवारी घडली असून आज या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल साईट्सवर वाऱ्यासारखा पसरला. मात्र,मयत अनेक पालकांकडून  पोलिसांना या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कळकळीचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रसारमाध्यांना हा व्हायरल  व्हिडिओ हटविण्याचे तसेच तो व्हिडिओ पुढे व्हायरलन करू नये असे आवाहन केले. याची प्रथम दखल घेत 'लोकमत' ने संबंधित व्हायरल व्हिडिओ हटविला आणि तो व्हिडिओ व्हायरल करू नका असे पोलिसांचे आवाहन नागरिकांपर्यंत पोहचविले आहे. 

 मुलीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही मुलगी गार्डिंनिया इमारतीतील रहिवासी होती. गुरुवारी (28 जून) तिनं शेजारील गुंडेजा इमारतीच्या आठव्या मजल्यावर उडी मारुन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला तातडीनं साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी समतानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ती घरातून शिकवणीला जाते असे सांगून निघाली. पण ती शिकवणीला गेलीच नाही. शेजारी असलेल्या आर्केड इमारतीच्या सी विंगमध्ये जाऊन तिनं आठव्या मजल्या दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत मुलीच्या पालकांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नसून तक्रारदेखील दाखल केलेली नाही. तसेच पोलीस तपासात सुसाईड नोटसुद्धा सापडलेली नाही.   

Web Title: Do not viral the girl's suicide video; Appeal for Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.