सिंगल पक्ष्यांना खाद्य देऊ नका, कारण... - पक्षिमित्रांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:30 AM2018-12-20T03:30:47+5:302018-12-20T03:31:36+5:30

पॉज (मुंबई) संस्थेचे सचिव सुनीश कुंजू यांनी या संदर्भात सांगितले की, सिगल हा पक्षी स्थलांतरित आहे.

Do not feed single birds, because ... - Appeal for birds | सिंगल पक्ष्यांना खाद्य देऊ नका, कारण... - पक्षिमित्रांचे आवाहन

सिंगल पक्ष्यांना खाद्य देऊ नका, कारण... - पक्षिमित्रांचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : परदेशातून स्थलांतर करून, सिगल पक्षी हिवाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध समुद्र किनाऱ्यावर वास्तव्य करतात. मात्र, पक्ष्यांना बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून खाद्य टाकले जाते. हे खाद्य सिगल पक्ष्यांना धोकादायक असून, त्याच्या मृत्यूचे आणि अग्रेसिव्ह होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पक्षिमित्रांचे म्हणणे आहे.

पॉज (मुंबई) संस्थेचे सचिव सुनीश कुंजू यांनी या संदर्भात सांगितले की, सिगल हा पक्षी स्थलांतरित आहे. हिवाळ्याच्या दिवसात मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया, मरिन लाइन्स, वरळी सीफेस, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहिम खाडी आणि गोराई खाडीच्या किनारपट्टीवर दिसून येतात. मुंबईतल्या या महत्त्वाच्या समुद्र किनाºयावर पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांकडून सिगल पक्ष्यांना खाद्य दिले जाते. यात फरसाण प्रकारामधील गाठ्या हा पदार्थ प्रामुख्याने सिगल पक्ष्यांना खाण्यासाठी दिला जातो. परंतु सिगल पक्ष्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. समुद्रातील छोटे-छोटे मासे, खेकडे, इतर जलचर प्राणी हे सिगल पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. सहजरीत्या पक्ष्यांना खाद्य उपलब्ध झाले, तर ते पर्यटकांवर अवलंबून राहण्याची त्यांना सवय लागेल. जर त्यांना पर्यटकांकडून खाद्य मिळाले नाही, तर कालांतराने पर्यटकांवर सिगल पक्ष्यांचे हल्लेही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच पर्यटकांनी पक्ष्यांना खाद्य पदार्थ देणे बंद केले पाहिजे.
‘बीच प्लीज’ मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे म्हणाले की, गेल्या ६८ आठवडे दादर चौपाटी स्वच्छ करण्याची मोहिम सुरू आहे. दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहीम सुरू करण्याच्या आधीपासून तुरळक प्रमाणात सिगल पक्षी येत होते. दादर चौपाटी स्वच्छ झाल्यापासून सकाळच्या वेळी सिगल पक्षी मोठ्या प्रमाणात किनाºयावर दिसून येतात.

पक्ष्यांबाबत जनजागृती
मला पकडणे किंवा मला अन्न देणे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा आहे, असे सूचना फलक कांदळवन विभागाच्या वतीने किनारपट्टीवर लावण्यात येणार असल्याचे पॉजने सांगितले.
उडण्याचा स्तर खालावतो
सिगल पक्ष्यांना मानवनिर्मित खाद्यपदार्थ खाण्यास घातल्याने त्यांचा उडण्याचा स्तर खालावतो. गेटवे आॅफ इंडिया ते एलिफंटा गुफेपर्यंत जलवाहतुकीने प्रवास करताना कित्येक पर्यटक सिगल पक्ष्यांना वेफर्स खाऊ घालतात.

च्सिगल हे कावळ्यांसारखे आहेत. समुद्रात जे काही मिळेल, ते खातात आणि जगतात. सिगल पक्षी मनुष्याला घाबरत नाहीत. त्यामुळे खाद्यासाठी खूप जवळ येतात. परिणामी, सिगल पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य शरीरासाठी उपयुक्त आहे.

Web Title: Do not feed single birds, because ... - Appeal for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.